आधी पैसे द्या मगच उपोषण सोडु अशी ठाम भुमीका
आष्टी : आष्टी तालुक्यातील रुईनालकोल, नांदा,
सराटेवडगाव,मेहकरी या गावासह आष्टी तालुक्यातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी दि.१६ फेब्रुवारीपासून हिरडगाव साखर कारखान्याच्यासमोर आमरण उपोषण सुरु केलेले आहे.आज उपोषणकर्त्याचा दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात एफआरपीप्रमाणे पेमेंट जमा केल्याशिवाय कारखान्यासमोरून आम्ही उठणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्याचा आहे.
आष्टी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे सन २९१८-२०१९ गळीत हंगामात हिरडगाव येथील श्री साईकृपा शुगर अँड अलाईस इंडस्ट्रीज या कारखान्यात आष्टी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी ऊस घातला होता सरकारी नियमानुसार १५ दिवसात एफआरपीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणे अपेक्षित व बंधनकारक होते परंतु असे असताना आजपर्यंत एफआरपीनुसार उसाचे पैसे संबंधित शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत वारंवार कारखान्यास प्रत्यक्ष भेटी देऊनही पैसे न देताच चालू हंगामात कारखाना सुरू करून शेतकऱ्यांचे पैसे अद्यापही न देता शेतकऱ्याची व शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत सापडला आहे. व आता शेतकऱ्यांपुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव या कारखान्यासमोर उपोषण करावे लागले. दुसरा दिवस असून कारखान्याने त्वरित पार्टी प्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे नसता तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा उपोषणकर्त्या शेतकर्यांनी घेतला आहे.