संत रोहिदास महाराज यांची जयंती घरोघरी साजरी करा –  ग्रा पं सदस्य गणेश कदम


संत रोहिदास महाराज यांची जयंती घरोघरी साजरी करा –  ग्रा पं सदस्य गणेश कदम


आष्टी : समाजाचे आराध्यदैवत व आपल्या भक्तिमार्गातून मातृ-पितृ सेवा व स्त्री-पुरुष समानता तसेच समाजातील अंधश्रद्धेविरोधात समाजजागृती व खरी भक्ती व मानव जीवन कसे जगावे, याचे प्रबोधन करणारे, तसेच वेद-पुराणाचा अभ्यास करून अनेक पंडितांना आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हरवून त्या काळात राजदरबारी आपला ठसा उमटविणारे व शीख समाजाच्या पवित्र ग्रंथात आपल्या ओव्यांचा समावेश करणारे चर्मकार समाजातील महान योगी, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आवाहन खूंटेफळ ग्रामपंचायत सदस्य गणेश कदम यांनी केले.

काशीजवळ गोवर्धनपुर येथे १४३३ मध्ये आई कामशी व वडील रघु यांच्या पोटी जन्मलेल्या या महान संत रोहिदास महाराज यांची तिथि नुसार माघ पौर्णिमेला जयंती उत्साहात साजरी करण्यात यावी असे आवाहन गणेश कदम यांनी केले.

देशात जातीयतेच्या विरोधात बंड उभारण्याची हिम्मत 14 व्या शतकात संत रोहिदास महाराज यांनी दाखवली. मनुष्य जातीने नाही तर आपल्या कर्माने माणूस लहान-मोठा होत आसतो. आपण सर्वजण समान आसल्याची शिकवण संत रोहिदास त्यांनी दिली.अशा महान संताची जयंती उत्साहात साजरी करण्यात यावी असे आवाहन गणेश कदम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here