कवी सय्यद अलाऊद्दीन यांचा संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांच्या हस्ते सत्कार   

 

आष्टी : आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाचे प्रसिद्ध कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांचा वाढदिवसानिमित्त संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांच्या हस्ते
प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे साहेब, उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब मुटकुळे, अविनाश कंदले,कार्यालयीन अधीक्षिका 9405सरस्वती जाधव मॅडम, प्रा.अशोक भोगाडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका कर्मचारी वृंद यांनी शुभेच्छा दिल्या. कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांचे आज वर 12 पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांच्या पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या कविता दोन विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमासाठी आहेत.झिंदाबाद… मुर्दाबाद कवितासंग्रहाला मानाचा कुसुमाग्रज पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here