पुरुषाप्रमाणे महिलांनी नवनवीन कल्पना शोधून व्यवसायाकडे वळावे – सरपंच अनिल ढोबळे

 

आष्टी : ग्रामीण भागातील महिला फक्त गृह काम करतानाच दिसत आहेत.आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी महिलांनी नव नवीन कल्पना शोधून घरगुती लघुउद्योग करण्यासारखे आहेत.आधुनिकीकरण यंत्राच्या सामुग्रीचे आजकाल विविध व्यवसाय आहेत. पुरुषाप्रमाणेच महिलांनी ही व्यवसायाकडे वळल्यास नक्कीच प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन सरपंच अनिल ढोबळे यांनी केले.
ते कडा येथे मंगळवार दि.१५ फेब्रुवारी रोजी
सारिका पवळ,शारदा चंद्रशेखर वडगांवकर या महिलांनी एकत्र येत यांनी सुरू केलेल्या स्वामी रिजरेशन या नुतन दालनामध्ये जुन्या बॅट-या नवीन करुन ७० टक्के पैशाची बचत होणार आहे.या नुतन व्यवसायाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना सरपंच ढोबळे म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.कडा शहरातील या महिलांचा इतर महिलांनी आदर्श घेऊन नवीन व्यवसायात प्रगती करावी असे शेवटी म्हणाले. या नुतन दुकानउदघाटनप्रसंगी उपसरपंच संपत कर्डीले,शंकर देशमुख,अंबादास कर्डिले,भागवत साहेब,गर्जे साहेब,नाईकवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पत्रकार विनोद ढोबळे,अविनाश कदम,रघुनाथ कर्डिले,राजेश राऊत,अक्षय विधाते,बाळू देशमुख,बंटी गायकवाड,राजू शिंदे, दिपक गरूड,संजय पवळ, सुभाष सोनवणे,संभाजी कर्डिले,दाणी मामा,सागर ढोबळे आदी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे दादा पवळ,चंद्रशेखर वडगांवकर,सोमनाथ पवळ,साई पवळ,सिद्धेश राऊत यांनी स्वागत व उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here