श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी होणार

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी होणार

दर सालाबादाप्रमाणे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी दि. १९ फेब्रुवारी रोजी ( शनिवार ) परंडा युवा सोनार संघटना व परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशन तालुका सोनार समाजाच्या वतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.

परंडा शहरातील कल्याणसागर बॅकेजवळ चिंतामणी यांच्या मातोश्री निवास येथे नरहरी महाराज यांचे पुण्यतिथी निमीत्त किर्तन व भजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची पुजा करुन दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी,गुलाल उधळण्याचा व भजन, महाप्रसादाचा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे. ह.भ.प. गणेश  महाराज भोरे कार्लेकर यांचे किर्तन होणार आहेे. तरी वारकरी मंडळ व सर्व बाल वारकरी वृंदाची टाळ ,ढोल मृदंगाच्या गजरात ,भव्यदिव्य असा कार्यक्रम उत्साहात साजरा होणार आहे.

या कार्यक्रमास सर्व समाजातील बांधवांनी, भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन परंडा युवा सोनार संघटना व परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशनने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here