हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे शनिवारी दुपारी हि घटना घडली होती. पोलिसांनी या चोरट्याकडून तब्बल दिड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे हिंगोली : पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेला चाकूचा धाक दाखवून सोने चांदीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अवघ्या बारा तासांत अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व नर्सी नामदेव पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे शनिवारी दुपारी हि घटना घडली होती. पोलिसांनी या चोरट्याकडून तब्बल दिड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.