
जिल्हाप्रशासन व नगरपरीषदेमार्फत संगनमतानेच कु-हाडबंदी असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कडुनिंबाच्या झाडाचा खुन करून आंदोलकांची सावली हिरावली
____
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी सावली देणा-या ५० वर्षीय कडुनिंबाच्या झाडावर जिल्ह्यात कु-हाडबंदी कायदा असताना झाड तोडण्यास विरोध करणा-या पर्यावरण प्रेमी सामाजिक कार्यकर्त्यांना नगरपरीषदेमार्फत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल ३५३ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची उघड उघड धमकी देत अखेर झाडाचा खुन केला.
प्रजासत्ताकदिनी सफाई कामगार महिलेच्या झाडावरील आंदोलनाचा प्रतिशोध
____
दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी सफाई कामगार महिला आपल्या न्याय मागण्यांसाठी कडुनिंबाच्या झाडावर चढुन आंदोलन केले होते तेव्हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंढे यांच्या उपस्थितीत आ.संदिप क्षीरसागर यांनी झाडावर चढुन महिलेची समजुन काढत आंदोलन सोडवले होते याचाच राग मनात धरत सुडबुद्धीने झाड तोडण्यात आल्याची चर्चा सुरू होती.
निष्क्रिय जिल्हाधिकारी व नगरपरीषदेची झाड तोडण्याची कार्यतत्परता निषेधार्ह
____
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणारे ३-४ दिवस आमरण उपोषण करूनसुद्धा जिल्हाप्रशासनाने दखल न घेतल्यानंतरच झाडावर चढुन आंदोलन करण्याच्या घटना घडल्या आहेत, शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी दि. २९ डिसेंबर रोजी झाडाला काटेरी कुंपण लावण्याबाबत विनंती केली होती या पत्राच्या अनुषंगानेच सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दोनवेळा लेखक निवेदन दिले होते.
एकंदरीतच जिल्हाप्रशासन आंदोलनकर्त्यांचे प्रश्न सोडवु शकत नसल्याचे मान्य करत असून झाड तोडण्याच्या निर्णयाचा सामाजिक कार्यकर्ते निषेध करत आहेत.
निदान रोटरी क्लब बीड यांना आंदोलनकर्त्यांना निवारा शेडची परवानगी द्यावी
____
बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांसाठी आजचे विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर तत्कालीन जिल्हाधिकारी बीड यांनी बसण्यासाठी ओटा बांधुन दिला होता, त्याच अनुषंगाने गेल्यावर्ष भरापासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन, आंदोलनानंतर रोटरी क्लब बीड यांनी आम्ही स्वखर्चाने शेड बांधुन देतो फक्त जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्या असे लेखक दिल्यानंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना दोन महिन्यापुर्वी आंदोलनानंतर प्रत्यक्ष भेटून विनंती केली असता जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकारली एकंदरीतच निदान कडुनिंबाचे झाड तोडल्याने आंदोलनकर्त्यांची सावली हिरावली असुन आतातरी शेड बांधण्याची परवानगी जिल्हाधिका-यांनी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, शेख युनुस, संदिप जाधव, नितिन सोनावणे,मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शेख मुबीन, एम. एस.युसुफभाई,डाॅ.संजय तांदळे यांनी केली आहे.