काय आहे ई श्रम कार्ड


e-SHRAM Card: असंगठित क्षेत्रातील कामगारांसाठी योजनांचे लाभ मिळवण्यासाठी केंद्र सरकारने २०२१ मध्ये ई-श्रम पोर्टलचा लॉन्च केले होते. ईपीएफओ (EPFO) या ईएसआईसी (ESIC) सदस्य नसलेल्या मजुर आणि कामगारांसाठी ई-श्रम ही अशा सुरू केले आहे.
(e SHRAM Card know How to register for E Shram Card Online and e-SHRAM card benefits)

कामगारांना होणार लाभ (e-SHRAM card benefits)

श्रमिक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराने वेबसाईटरवर आपली नोंदणी करावी. त्यानंतर अर्जदाराला ई-श्रम कार्ड मिळाल्यानंतर सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळेल. ई-श्रम वर नोंदणी केलेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची नुकसानी भरपाई मिळेल. तर अपंग झाल्यास एक लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळेल. तसेच सरकारी योजनांचा लाभ या पोर्टलच्या माध्यमातून मिळेल.

काय आहे ई श्रम कार्ड (What is E Shram Card)

ई-श्रम पोर्टल वर यशस्विरित्या नोंदणी केल्यास कामगारांना ई-श्रम कार्ड जारी केले जाईल. त्यावर १२ अंकाचा UAN क्रमांक नमूद असतो. ई-श्रम पोर्टलचा वापर करणार्‍या कामगारांना इतर सरकारी सामाजिक कल्याण योजनेसाठी अर्ज करण्याची गरज नाही

 

ई-श्रम कार्डासाठी असा करा ऑनलाईन अर्ज (How to register for E Shram Card Online)

नोंदणी करण्यासाठी e-SHRAM portal वर लॉग ऑन करा
वेबसाईटवर दिलेल्या Register on e-SHRAM वर क्लिक करा
सेल्फ रजिस्ट्रेशन पेजवर आधारशी संलग्न मोबाईल नंबर नमूद करावा आणि कॅप्चा टाईप करा.
आता Send OTPवर क्लिक करा
आता ओटीपी टाकल्यानंतर ई-श्रम साठी नोंदणीचा फॉर्म उघडेल.
त्यात आपले शैक्षणिक माहिती, बँकेची आणि इतर माहिती नमूद करा.
सेल्फ डिक्लेरेशन प्रिव्ह्यूवर क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला एक UAN कार्डॆ मिळेल.
हे कार्ड डाऊनलोड करून प्रिंट आऊट काढून ठेवा, भविष्यात सरकारी योजनेसाठी या कार्डचा उपयोग होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here