लातूर:चाेरट्याने सिगारेटचे बाॅक्स लंपास

लातूर : उदगीर येथील व्यापारी विक्रीसाठी लागणाऱ्या किराणा मालाची खरेदी करण्यासाठी लातूरला आले हाेते. दम्यान, त्यांनी किराणा मालाची खरेदी करुन ताे माल एका वाहनातून उदगीरकडे घेवून जात हाेते. दरम्यान, गुळ मार्केट परिसरात गाडीचा वेग कमी झाल्यानंतर पाठीमागून चढून चाेरट्याने सिगारेटचे बाॅक्स लंपास केले. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात साेमवारी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, पाेलिसांनी एका चाेरट्याला अटक केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, साेमवार, ७ फेब्रुवारी रोजी उदगीर येथील व्यापारी दैनंदिन विक्रीसाठी लागणाऱ्या किराणा मालाची खरेदी करण्यासाठी लातूर येथे आला होते. दरम्यान, किराणा मालाची खरेदी झाल्यानंतर तो माल एका वाहनामध्ये भरून परत उदगीरकडे निघाले असता, लातुरातील गुळ मार्केट परिसरात वाहनाचा वेग कमी झाला. याचाच फायदा घेत वाहनामध्ये पाठीमागून चढून अज्ञात चोरट्यांनी सिगारेटचे बॉक्स (किंमत ७० हजार ३९८ रुपये) लंपास केले. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या विशेष पथकाने केला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अजय नितेश उपाडे (रा. जयनगर लातूर) याला ताब्यात घेतले. अधिक चाैकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय, चाेरलेला मुद्देमाल पाेलिसांकडे सुपूर्द केला. ही कामगिरी सहायक फाैजदार वहीद शेख, रामचंद्र ढगे, पोलीस अंमलदार महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के यांच्या विशेष पथकाने केली. पुढील तपास पोलीस अंमलदार पवार करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here