मातेने आपल्या पोटच्या मुलगा आणि मुलीला कुशीत घेऊन आत्मदहन केल्याची हृदयद्रावक घटना

एका मातेने आपल्या पोटच्या मुलगा आणि मुलीला कुशीत घेऊन आत्मदहन केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशच्या पन्ना जिल्ह्यांमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमध्ये दीड वर्षांची मुलगी आणि मुलीच्या आईचा मृत्यू झाला असून ४ वर्षांच्या चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना पन्ना जिल्ह्याच्या सलेहा ठाणा क्षेत्रातील कठवरिया गावात घडली आहे. कठवरियाचा रहिवाशी राजेश कोरी बकऱ्यांना चारण्यासाठी घेऊन गेला होता. त्याचदरम्यान आई-वडील भागवत कथेत सहभागी होण्यासाठी गेले होते. घरी त्याची पत्नी द्रौपदी आपल्या ४ वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षांच्या मुलीसोबत बसली होती. पती, सासू-सासरे बाहेर गेल्यानंतर द्रौपदीने दरवाजा बंद केला. मग मुलगा आणि मुलगीवर रॉकेल टाकून जवळ बसवले आणि स्वतःवरही रॉकेल ओतून घेतले. त्यानंतर मुलांसोबत तिने स्वतः पेटवून घेतले.

राजेशचे आई-वडील जेव्हा घरी आले तेव्हा घरातून धुराचे लोट बाहेर येत असल्यामुळे हैराण झाले. मग त्यांनी आरडाओरडा करून परिसरातील लोकांना एकत्र बोलावून घेतले आणि जेव्हा लोकांनी दरवाजा उघडला तर तेव्हा घरातील अवस्था पाहून लोकं हैराण झाले. द्रौपदी आणि तिची दीड वर्षांची मुलगी पूर्णपणे जळाले होते आणि दोघींचा मृत्यू झाला होता. तर ४ वर्षांचा मुलगा काही प्रमाणात जळाल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ही घटना हुंड्यासाठी छळ केल्यामुळे घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक म्हणाले की, याप्रकरणाचा तपास केला जात आहे. जे काही तथ्य समोर येईल, त्यानुसार कारवाई केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here