पैशांच्या लोभापायी आपल्याच मित्राच्या बायकोच्या हत्येची सुपारी घेतल्याची घटना नोएडा येथे घडली आहे. हत्येनंतर मृतदेहावर बलात्कार केल्याचंही उघड झालं आहे.
या घटनेतील आरोपीचं नाव रामबीर असं आहे. नोएडा येथे राहणारा विजय (बदललेले नाव) हा 28 वर्षांचा रिक्षा चालक त्याचा मित्र आहे. विजयने रामबीरला आपल्या बायकोच्या हत्येची सुपारी दिली होती. 19 जानेवारी रोजी विजयने बायकोची हत्या केल्यास 70 हजार रुपये देईन, अशी लालुच रामबीरला दाखवली. त्याचे आगाऊ पैसे म्हणून 2 हजार रुपयेही रामबीरला दिले.
ते 2 हजार रुपये रामबीरने दारूत उडवले. 20 जानेवारी रोजी विजय आणि रामबीरची पुन्हा भेट झाली. तेव्हा पुन्हा सुपारीचा विषय निघाला. तेव्हा आधी रामबीरने सुपारी घ्यायला नकार दिला. त्यामुळे विजयने सुपारीची रक्कम वाढवून दीड लाख रुपये केली. दीड लाख रुपयांच्या उल्लेखाने रामबीरला लोभ झाला आणि त्याने तिच्या हत्येची सुपारी घेतली.
हत्येच्या दिवशी रामबीर विजयच्या घरी पोहोचला. त्याने बाहेरून दार ठोठावून आपण विजयचा मित्र असून त्याने पैसे पाठवल्याचं त्याच्या बायकोला सांगितलं. तिचा यावर विश्वास बसल्याने तिने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच रामबीरने तिच्या तोंडावर बुक्क्याने मारलं आणि तिच्या डोक्यावरही प्रहार केला. या हल्ल्याने पीडिता बेशुद्ध होऊन पडली. तेव्हा रामबीरने तिचं डोकं जमिनीवर वारंवार आपटायला सुरुवात केली. या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. मृत्युनंतर रामबीरने तिच्या मृतदेहावर बलात्कार केला.
या प्रकरणी पोलिसांनी रामबीरला अटक केली. त्याची चौकशी करताना विजयने त्याला गुन्हा करण्यासाठी सुपारी दिल्याचं उघड झालं. आपल्या 22 वर्षांच्या बायकोची हत्या केल्याच्या आरोपावरून विजयला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने आपल्या मेहुणीशी लग्न करण्यासाठी बायकोच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघड झालं.