इमारतीच्या बाहेर गाडीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ

गोरेगावमध्ये एका इमारतीच्या बाहेर गाडीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

मुंबई : गोरेगावमध्ये (Goregaon) एका इमारतीच्या बाहेर गाडीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे.
महिलेच्या अंगावर कोणत्याही जखमा नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता त्या महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोरेगावमधील अस्मि कॉम्प्लेक्स आर 4 बिल्डिंग येथे गाडीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील ही महिला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महिलेच्या अंगावर कोणत्याही जखमा नसून तिचे कपडे ही व्यवस्थित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस या महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या घटनास्थळी इन्व्हेस्टिकेशन व्हॅन, डाॅग स्काॅड, फॉरेन्सिक टिमने ही पंचनामा केला आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here