बीड : कर्नाटक येथे शाळा-महाविद्यालयांत हिजाब वापरण्याविषयी मुसलमान विद्यार्थिनींकडून आग्रह केला जात आहे, तर त्याविरुद्ध हिंदु विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्याकडून भगवे उपरणे अन् ओढणी घालून निषेध केला जात आहे.वादाचे पडसाद बीड येथेही उमटले.त्याविषयी बीड येथे एम्.आय.एम्.च्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्यांकडून ‘पहिले हिजाब फिर किताब’ असे अनेक फलक शहरात लावण्यात आले आहेत. मालेगाव येथेही मुसलमानांनी या विषयावरून मोर्चा काढला.
कर्नाटकात महाविद्यालयांतील हिजाबच्या विरोधाचे बीड आणि मालेगाव येथे पडसाद !
मालेगाव येथे मोर्चा असे फलक लावल्याविषयी एम्.आय.एम्.च्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्यांवर पोलीस काय कारवाई करणार आहेत ?
यावरून मुसलमानांसाठी धर्मच प्रथम असतो, इतर सर्व गोष्टी दुय्यम असतात, हे सिद्ध होते. शिक्षणात मुसलमान मागास असल्याची ओरड करणारे आता याविषयी काही बोलतील का ?