पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी अडवली

बीड : ‘पोलीस आरोपींची पाठराखण करत असून आरोपींना अटक करावी’ या मागणीसाठी मयत शेतकऱ्यांच्या मुलींनी पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची गाडी अडवली.

‘आमचे वडील गेले आता तरी न्याय द्या’ अशी मागणी या मुलींनी केली. विशेष म्हणजे, धनंजय मुंडे यांनी दोन वेळा अश्वासन दिलेले मात्र अद्यापही काहीच कारवाई न झाल्याने या मुलींनी संताप व्यक्त केला. ‘विकास या घडलेल्या कामाचे’ उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमातून बाहेर निघता ना थेट मुलींनी धनंजय मुंडे यांच्या गाडी समोर येत गाडी थांबवली व आपले गाऱ्हाणे मांडले.

यावेळी पोलिसांनी त्या मुलींना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या विरोध झुगारत या मुलीने थेट धनंजय मुंडेंजवळ आपले गाऱ्हाणे मांडले. बीडच्या वडवणी तालुक्यातील कुप्पा येथे संभाजी वडचकर यांचा भावकीच्या वादातून मारहाणीत गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी वडवणी पोलिसात गुन्हा दाखल आहे. मात्र यात 302 चे कलम वाढविलेले नाही, तसंच आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटकही केली नाही, पोलीस आरोपीला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत या वडचकर यांच्या किर्ती व प्रिती या दोन मुलींनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पालकमंत्र्यांसमोर उपस्थित केला. बीड जिल्ह्यातील लहान-मोठा प्रकरणात थेट पीडितांना पालकमंत्री महोदयांच्या गाडीला आडवे थांबावे लागते तसंच पालकमंत्र्यांनी दोन वेळा दिलेल्या आश्वासन देखील पूर्ण होत नाही. यामुळे जिल्ह्यातील एकूणच कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नासंदर्भात संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here