संत साहित्याने नटलेल्या मराठीला प्राचीन परंपरा आहे – प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे

आष्टी : इ.स. पूर्वच्या गाथा सप्तशतीपासून मराठीला प्राचीन परंपरा असून संतसाहित्याच्या अभंग ओव्यांनी मायबोली मराठी सशक्त भाषा झाली,
आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या एकविसाव्या शतकात गांभीर्याने वाटचाल करणाऱ्या व संतसाहित्याने नटलेल्या मराठी भाषेला वैभवी परंपरा आहे .”
असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ. सोपानराव निंबोरे यांनी काढले.
आष्टी येथील ॲड बी. डी. हंबर्डे महाविद्यालयाच्या ऑनलाईन व्याख्यान प्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.
मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेड , राष्ट्रीय सेवा योजना व ॲड बी. डी. हंबर्डे यांच्या संयुक्त विद्ययाने मराठी भाषा पंधरवाडा निमित्ताने प्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. दत्तात्रय फलके ( ताहाराबाद, नाशिक ) यांचे व्याख्यान आयोजित केले होते .
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शन संस्थाध्यक्ष श्री. किशोरनाना हंबर्डे व सचिव श्री.अतुलशेठ मेहेर यांनी केले.
प्रा. डॉ. दत्तात्रय फलके यांनी ‘ मराठी असे आमुची मायबोली ‘ या विषयावर आपले विचार व्यक्त केले .
या कार्यक्रमास मराठी साहित्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष व प्रसिध्द कवी आ. य. पवार , डॉ. सुहास गोपने , प्रा.जयनुल्लाखान पठाण , डॉ. रामकिसन पोकळे , प्रा.चंदन साबळे, प्रा. स्वाती चौधरी, डॉ.रवी सातभाई , आदी मान्यवरांसह विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. राजाराम सोनटक्के यांनी तर आभार मराठी साहित्य प्रतिष्ठान च्या उपाध्यक्षा डॉ. विद्या काशीद यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here