विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था केवळ ऑनलाइन शिक्षणामुळे खराब झाली

नांदेड : कोरोना वैश्विक महामारीमुळे कुलूपबंद झालेल्या शाळा अखेर दोन वर्षांनंतर उघडताच विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झालाय.परंतु, वर्गात बसण्याची, प्रत्यक्ष लिखाण आणि पुस्तकाची सवय मोडलेल्या विद्यार्थ्यांची मात्र धांदल उडालीय.असाच एक प्रकार नांदेड येथील एका शाळेत घडलाय. नांदेड शहरातील भावसार चौकात वास्तव्यास असलेल्या व पेशाने सामाजिक वनीकरण खात्यात नोकरी करणाऱ्या अण्णासाहेब वडजे यांच्या चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या दक्षच्या हातात पेपर पडताच अक्षरशः त्याला दरदरून घाम फुटून तो अत्यवस्थ झाल्याने त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जावा लागलेय.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. इच्छा नसताना पालकांना मुलांच्या हातात मोबाईल द्यावा लागला. परंतु क्षणर्धातच मुठीत विश्व असल्याचा आभास असणाऱ्या या ऑनलाइन शिक्षणाचे विश्वही तसेच आभासी आणि क्षणिक आहे. या ऑनलाइन शिक्षणासाठी गेली दोन वर्षे हातात मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर घेऊन बसणारी ही चिमुकली मुली आता या साधनांची आहारी गेली आहेत. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसतोय. दोन वर्षे ऑनलाइन राहिलेली शाळा आता जानेवारीमध्ये काही दिवसांसाठी ऑफलाईन सुरु झाल्या खऱ्या मात्र ओमायक्रॉनमुळे त्या बंद करण्यात आल्या. परंतु शाळा सुरू होताच ऑनलाईन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी किती आत्मसात केला, याची चाचपणी घेण्यासाठी शाळांनी चौथीतील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली.

परंतु, गेल्या दोन वर्षा पासून प्रत्यक्ष वर्गात बसण्याची, लिखाण करण्याची ,पुस्तकाची सवय मोडलेल्या विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष परीक्षा देण्याची आणि लिखाण करण्याची भीती वाटू लागलीय. कारण नांदेड येथील चौथ्या वर्गात शिकणाऱ्या दक्षला जेंव्हा प्रत्यक्ष पेपर हातात आला तेंव्हा त्याची घाईबर गुंडी उडाली. तर हातातील परीक्षा पेपर पाहून तो थरथरत होता.तर पेपर पाहून अक्षरशःघाम फुटला व तो मोठमोठ्याने रडू लागला. परीक्षा आणि लिखाणाची सवय मोडलेल्या दक्षची ही अवस्था पाहून त्याचे आई वडीलही घाबरले आणि त्यास मानसोपचार तज्ञाकडे नेण्यात आले. दरम्यान दक्ष प्रमाणेच बऱ्याच विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था केवळ ऑनलाइन शिक्षणामुळे झाल्याची माहिती मानसोपचार तज्ञ डॉ. रामेश्वर बोले यांनी दिलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here