लतादीदींचे बालपण , कोल्हापुरात 10 वर्ष राहिले मंगेशकर कुटूंब याच घरात

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कोल्हापुरातील आठवणींनादेखील उजाळा मिळालाय. मंगेशकर कुटुंबीय कोल्हापुरात दहा वर्षे भाड्याच्या घरात राहण्यासाठी होतं.

कोल्हापुरातील लक्ष्मण कारेकर यांच्या घरी अवघ्या दहा रुपयांच्या किरायावर हे मंगेशकर कुटुंबीय राहत होतं.Lata Mangeshkar Lata’s childhood was spent in this house in Kolhapur, Mangeshkar family stayed for 10 yearsगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कोल्हापुरातील आठवणींनादेखील उजाळा मिळालाय. मंगेशकर कुटुंबीय कोल्हापुरात दहा वर्षे भाड्याच्या घरात राहण्यासाठी होतं. कोल्हापुरातील लक्ष्मण कारेकर यांच्या घरी अवघ्या दहा रुपयांच्या किरायावर हे मंगेशकर कुटुंबीय राहत होतं.

तीन खोल्यांच्या या छोटेखानी भाड्याच्या घरात लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर या भावंडांचे बालपण गेलं. त्या वेळी आर्थिक विवंचनेत असलेल्या कुटुंबीयांना कारेकर कुटुंबीयांनी वेळोवेळी मदतही केली होती. आज लतादीदींच्या निधनाची बातमी आल्यानंतर कारेकर कुटुंबीयांनी दीदींसोबतच आपल्या आठवणी ताज्या केल्या.कल्पना कारेकर तसेच लक्ष्मण कारेकर यांनी लतादीदींच्या आठवणी जागवल्या. लहानपणी लतादीदी कशा होत्या, त्यांची कौटुंबिक परिस्थिती कशी होती याबाबत त्यांनी माहिती दिली. अर्जुन नलावडे यांनी सांगितले की, कोल्हापुरात आल्यावर लतादीदींची जयप्रभात स्टुडिओला हमखास भेट असायची. त्या अतिशय मनमोकळ्या स्वभावाच्या होत्या. त्यांच्या अनेक आठवणी कोल्हापूरशी जोडलेल्या आहेत

लता मंगेशकरद्वारा गायले गेलेले शेवटचे गाणे ‘सौगंध मुझे इस मिट्टी की’

सौगंध मुझे इस मिट्ठी की” हे गाणे

गूगल ट्रेंड नुसार रिपोर्ट सांगत आहे की, युजर्स लता मंगेशकरद्वारा गायले गेलेले शेवटचे गाणे ‘सौगंध मुझे इस मिट्टी की’ हे गाणं सर्च करत आहेत. हे गाणं त्यांनी 30 मार्च, 2019 रोजी रिकॉर्ड केले होते, जे देशातील जवानांना समर्पित होते. रिकॉर्डिंगआधी त्यांनी सांगितले होते की, मी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचे भाषण ऐकत होती. त्यांनी एक कवितेच्या काही ओळी म्हटल्या होत्या. जे मला वास्तविक प्रत्येक भारतीयांच्या मनांतील बोल वाटत होते आणि त्या ओळींनी माझ्या हृदयाला स्पर्श केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here