बीड ,गेवराई आणि पाटोदा या ठिकाणच्या रूग्णालयाला नोटीस, परवाना रद्द करण्यात येणार

बीड : कोरोना महामारीने मागील दोन वर्षांपासून अधिक काळ कोरोना महामारीने जगभरात हाहाकार माजवला आहे.दरम्यान या काळात अनेकांना जीव गमवावा लागला असून उपचारासाठी अनेकांनी लाखो रुपये द्यावे लागले आहेत. दरम्यान काही खाजगी रुग्णालयाने कोरोना रुग्णांकडून बीलमध्ये जास्तीचे पैस उकळल्याचं एका लेखापरीक्षनातून समोर आलं होतं. त्यानंतर या रुग्णालयांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रुग्णांचे जास्तीचे पैसे परत देण्याचे आदेश देखील देण्यात आले होते. मात्र रुग्णालयांनी या आदेशाला न जुमानता रुग्णांचे पैसे परत न केल्यामुळे बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून येत्या दोन दिवसात रुग्णांना जास्तीचे पैसे परत करण्याच्या सूचना खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत. रुग्णांचे जास्तीचे पैसे परत न करणाऱ्या रुग्णालयांची नोंदणी रद्द करणार असल्याचेही रुग्णालयांना दिलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

रुग्णांचे जास्तीचे पैसे परत न करणाऱ्या रुग्णालयांमध्ये बीड शहरातील सहा खासगी रुग्णालयांची नावे असून गेवराई आणि पाटोदा या ठिकाणच्या एका रूग्णालयाला ही नोटीस बजावण्यात आली आहे. खालील रुग्णालयांना ही नोटीस बजावण्यात आली असून त्यांना भरायची रक्कम किती आहे ते पाहूया…

रुग्णालयाचे नाव रक्कम
दीप हॉस्पिटल, बीड शहर 75 हजार 158 रुपये
संजीवनी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, बीड

6 लाख 20 हजार
नवजीवन हॉस्पिटल, बीड 46 हजार 420 रुपये
धूत हॉस्पिटल, बीड

1 लाख 17 हजार 528 रुपये
कृष्णा हॉस्पिटल, बीड 7 हजार रुपये
लाईफ लाईन हॉस्पिटल, बीड 29 हजार 319 रुपये
आधार हॉस्पिटल, गेवराई 31 हजार 660 रुपये
माऊली हॉस्पिटल, पाटोदा 41 हजार 200 रुपये
तर या खाजगी रुग्णालयांना पैसे परत करण्यासाठी बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सक यांनी नोटीस बजावली आहे आणि हे पैसे जर दोन दिवसात त्यांनी परत नाही केले तर त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here