बीड : पाटोदा गेल्या तीन चार महिन्यांपासून भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले होते ,मात्र आता दहा बारा दिवसांपासून बाजारात पालेभाज्यांची प्रचंड आवक वाढू लागल्याने दर घसरले असून याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतात तसाच सोडून दिला आहे.पाटोदा येथील शेतकरी साहेबराव माधव बोराडे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील सुमारे वीस गुंठे मेथीवर ट्रक्टरने रोटरी फिरवला आहे.
मागील दोन महिन्यांपासून येवला तालुक्यातील वातावरणात वारंवार बदल होत असून कधी ढगाळ वातावरण तर कधी अवकाळी पाऊस,दव व धुके यामुळे सर्वच पिकांवर रोगराई पसरल्याने शेतकरी वर्गाने महागडी बुरशीनाशकांची तसेच पोषकद्रव्येयांची फवारणी करून पिके जगवली त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली .केलेल्या खर्चाच्या कितीतरी पटीने तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
सध्या बाजारात पालक,मेथी एक ते दोन रुपये , कोथंबीर पाच रुपये जुडी,बटाटे पंधरा ते वीस रुपये किलो,टोमाटो दहा रुपये,ढोबळी मिरची,कारली वांगी चाळीस रुपये,,कोबी प्लॉवर पंचवीस ते तीस रुपये आशा दराने विक्री होत आहे.
हिरवी मिरची तिखटच भाजीपाल्याचे दर उतरले असले तरी बाजारात हिरवी मिरची तिखटच असून तिची सत्तर ते ऐंशी रुपये दराने विक्री होत असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.शेवगा शेंगाचे दर मात्र गेल्या पाच सात महिन्यांपासून शंभर ते ऐकशी वीस रुपये असेच आहे.भेंडीची विक्रीही साठ ते ऐंशी रुपये दराने होत आहे.
डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व रोगट हवामानामुळे भाजीपाला पिकावर मावा व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने भाजीपला सोडून द्यावा लागला आताही भाजीपाला व्यापारी वर्गाला कवडीमोल भावात विकाव्या लागत आहेत यामुळे केलेला खर्च सोडाच मेहनतीचे पैसे सुद्धा मिळत नाही .मेथी,कोथंबीरिचे दर खुपच कमी झाले आहे.