धुळे तालुक्यातील नंदाभवानी मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी 4 कोटी 90 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. या निधीतून लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या नंदाभवानी मंदिर परिसराचा आता तिर्थक्षेत्र म्हणून कायापालट होणार आहे.या कामासाठी निधी मिळावा म्हणून आ. कुणाल पाटील यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.
धुळे तालुक्यातील रावेर शिवारातील वनक्षेत्रात असलेले नंदाभवानी हे जागृत देवस्थान असून धुळे जिल्हयासह खान्देशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. वनक्षेत्रात असल्यामुळे तिर्थक्षेत्राबरोबर पर्यटनस्थळ म्हणून नंदाभवानी देवस्थान परिसराचा विकास व्हावा म्हणून आ. कुणाल पाटील यांनी राज्याच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन वेळोवेळी आवाज उठविला आहे.