ट्रॅव्हल्स ही बस पहाटे गोव्याच्या दिशेने जात असताना अचानक पेट घेतला

पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या एका मनिष ट्रॅव्हल्सने (नं. जीए ०३/डब्लू २५१८) गुरुवारी पहाटे अचानक पेट घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. ही ट्रॅव्हल्स संपुर्ण जळून खाक झाली आहे. ही घटना आजपहाटे ४ वाजता वैभववाडी एडगांव घाडीवाडी जवळ घडली. या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र सुदैवाने ट्रॅव्हल्समधील ३७ प्रवासी सुखरुप आहे तर एक वयोवृद्ध महिला जखमी झाली आहे.

मनिष ट्रॅव्हल्स ही बस पहाटे गोव्याच्या दिशेने जात असताना करूळ घाट उतरल्यानंतर एडगांव जवळ ही बस येताच बसने अचानक पेट घेतला मात्र सुदैवाने चालकाच्या लक्षात येताच चालकाने बस थांबवली आणि बसमधील प्रवासी खाली उतरले. त्यानंतर बसने अचानक मोठा पेट घेतला. त्यानंतर सर्व प्रवाशांना वेळीच सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here