
मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा तारा निखळला -छगन भुजबळ ,रमेश देव यांच्या निधनाने अभिनयातला ” देव “आपण गमावला
जेष्ठ सिने अभिनेते रमेश देव यांना मंत्री छगन भुजबळ यांची श्रद्धांजली
मुंबई : जेष्ठ सिने अभिनेते रमेश देव आपले संपूर्ण आयुष्य फक्त अभिनयासाठी वाहीले. देव यांनी आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर काही दशके अधिराज्य गाजवले त्यामुळे त्यांच्या जाण्याने अभिनयातला देव हरपला आहे.आज चित्रपटसृष्टीतील एक देखणा तारा निखळला आहे. उत्साहाचा झरा असणाऱ्या नायकाला आज आपण मुकलो अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी जेष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आपल्या शोकभावना व्यक्त करताना मंत्री भुजबळ म्हणतात की , वयाच्या नव्वदीतही काम करण्याची त्यांची तयारी होती. त्यामुळे त्यांची अभिनयाप्रति असलेली निष्ठा दिसून येते. रमेश देव यांच्या निधनाने अभिनयातला ” देव “आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने देव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय देव कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.