आग्रा महामार्गावर भीषण अपघात , केमिकलच्या टॅकरला आग


धुळे : मुंबई -आग्रा महामार्गावर कंटेनर आणि केमिकल वाहतूक करणाऱ्या टॅँकरमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.
हाडाखेड – पलासनेर गावाच्या परिसारामध्ये हा भीषण अपघात घडला आहे. अपघातातनंतर टँकरला आग लागली, या आगीमध्ये ड्रायव्हर आणि क्लीनरचा जळून मृत्यू झाला आहे. कंटेनरमध्ये (containers) काही ट्रॅक्टर होते. ट्रॅक्टरच्या टायरने पेट घेतल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले.

आग पसरल्याने संबंधित टॅंकरने देखील पेट घेतला, या आगीमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून, अपघातग्रस्त वाहने जळून खाक झाली आहेत. रसायन वाहतूक करणाऱ्या टँकरमधून उग्र वास येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here