ठाणे जिल्ह्यातील निर्बध कायम !

ठाणे : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.परंतु त्यासाठी करोना प्रतिबंधक लस घेतलेल्या लाभार्थ्यांचे प्रमाण हे गृहीत धरण्यात आले आहे. करोना प्रतिबंधक लसीकरण झालेल्या पहिल्या मात्रेचे प्रमाण हे ९० टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे प्रमाण हे ७० टक्के असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अद्यापही पहिल्या मात्रेचे प्रमाण हे सुमारे ८७ टक्के इतकेच आहे. त्यामुळे राज्य सरकारचे पूर्वीचेच काही निर्बंध ठाणे जिल्ह्यासाठी लागू असणार आहे.राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर सरकारने ३० डिसेंबर २०२१ पासून राज्यात निर्बंध लागू केले होते. त्यानुसार रात्रीची संचारबंदी लागू झाली होती. तसेच सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसमारंभामधील उपस्थितीच्या संख्येवरही निर्बंध लागू करण्यात आले. गेल्याकाही दिवसांपासून राज्यात ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील ज्या जिल्ह्यात १८ वर्षांवरील लाभार्थ्यांपैकी ९० टक्के नागरिकांना करोना प्रतिबंधक लशीची पहिला मात्रा आणि ७० टक्के नागरिकांना लशीची दुसरी मात्रा मिळाली आहे. तेथील जिल्ह्यांना निर्बंधातून दिलासा देऊन निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. या जिल्ह्यांचा अ वर्गाच्या जिल्ह्यामध्ये सामावेश करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील ७३ लाख ४६ हजार ७९२ गृहित लाभार्थ्यांपैकी ६७ लाख ६८ हजार २०९ नागरिकांना लशीची पहिली मात्रा, तर ५३ लाख ३८ हजार ७५१ नागरिकांना लशीची दुसरी मात्रा मिळाली आहे. म्हणजेच, जिल्ह्यात ८७ टक्के नागरिकांना लशीची पहिली मात्रा तर, ७० टक्के नागरिकांना लशीची दुसरी मात्रा मिळाली आहे. परंतु पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण अद्यापही ८७ टक्के असल्याने ठाणे जिल्हा निर्बंध शिथिलतेपासून वंचित राहिला आहे. त्यामुळे राज्यात पूर्वी लागू असलेले काही निर्बंध कायम राहणार आहेत.

रात्रीच्या संचारबंदीचे नियम पूर्वीप्रमाणे

राष्ट्रीय उद्याने, पर्यटनस्थळे आणि सफारी नियमित वेळेत खुले राहतील. स्पा ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. परंतु केशकर्तनालयांना लागू असलेले नियम स्पासाठी लागू असतील. अंत्यविधीसाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा नसेल. तर रात्रीची संचारबंदी, जमावबंदीसह उर्वरित नियम पूर्वीप्रमाणे कायम राहणार आहेत.

ठाणे जिल्ह्यात करोना प्रतिबंधक लशीच्या पहिल्या मात्रेचे ९० टक्के प्रमाण अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्याला निर्बंधातून दिलासा मिळालेला नाही. ९० टक्के लसीकरण गाठण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here