क्राईमछत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यासंपादकीय

खाकीतील गुंड आरोपी सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास मोरे सह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांवर औरंगाबाद खंडपीठ उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शेवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


 

 

खाकीतील गुंड आरोपी सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास मोरे सह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांवर औरंगाबाद खंडपीठ उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शेवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या परिवाराला खाकीतील गुंडांनी केलेली मारहाण मोरेला भवली.

अँड .विकास भाले संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांचे सर्व स्तरातून कौतुक .

भारतातील पञकार यांना त्यांच्या परिवाराला पोलिसांनो मारहाण कराल तर गजाआड व्हाल.

जालना पोलिस अधीक्षक विनायक देशमुख विलास मोरे सह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांना बेड्या कधी ठोकणार.

माझ्या वडिलांनी सर्व पञकार यांच्यासाठी दिलेली आहुती आज गुन्हा दाखल झाल्यानंतर वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरली आहे. संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर

भारतीय दंड संहिता 1860 कलम 324,323,427,143,147,149
नुसार गुन्हा दाखल.

जालना दैनिक बुलंद शक्ती न्यूज नेटवर्क.
जालना जिल्ह्यातील शेवली पोलिस ठाण्याच्या गैरकारभाराचा पर्दाफाश दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांनी केला होता. त्यांनी या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे कसे पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास मोरे यांच्या आशीर्वादाने सुरू आहे याची पोलखोल पुराव्यानिशी चव्हाट्यावर आणली होती. या पुर्वी देखील दोन अधिकारी याच पोलिस ठाण्याचे निलंबित करण्यात आले होते. जनरल डायर विलास मोरे यांची ग्रहमंञी तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने चौकशी सुरू होती. आपली गैरकामे चव्हाट्यावर येऊ नये , आपली दुकानदारी सदैव सुरू राहावी यासाठी विलास मोरे यांनी चक्क नियोजन बद्ध कट आखुन आपल्या इतर साथीदार पोलिस कर्मचारी यांना घेऊन जालना जिल्ह्यातील शेवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वझर सरकटे या संपादक रामेश्वर दरेकर यांच्या गावापासून तिन किलोमीटर अंतरावर असलेल्या चागेफळ बेलोरा चौफुली वर नियोजित कट केला शेतकरी असलेल्या परसराम दरेकर यांना शेतात जात असताना कुठल्याही प्रकारची चुक नसताना गंभीर मारहाण करण्यात आली यात मारहाण एवढी गंभीर करण्यात आली होती की डोक्यात , अंगावर पायांवर लाठ्या काठ्या , दगडाने पायाची बोट ठेचली गेली जागिच बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या परसराम शिवाजी दरेकर संपादक रामेश्वर दरेकर यांच्या भावाला जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथुन त्यांना औरंगाबाद येथे जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले अतिदक्षता विभागात उपचार केल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस विभाग यांना तक्रार दिली माञ पोलिस यांनी विलास मोरे यांना अभय दिला भारतातील सर्व पञकार यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली माञ पोलिस यांनी विलास मोरे यास त्याच्या सहकारी यांना वाचविण्यासाठी पुर्ण प्रयत्न केला. संपादक रामेश्वर दरेकर यांनी आपल्या वडिलांना या घटनेनंतर जिवास मुकावे लागले आहे. भविष्यात जर अशा घटना भारतातील सर्व पञकार बंधु भगिनींचया परिवारासोबत घडतील तर देशाचा चौथा स्तंभ कसा जिवंत राहिल हे डोळ्यासमोर ठेवून जिवाची पर्वा न करता पञकार यांच्यासाठी वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली मा. उच्च न्यायालयाचे दोन न्यायाधीश यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी न करता थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारित केले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शेवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दिनांक 28/01/2022 रोजी मुख्य आरोपी सध्या कार्यरत मौजपुरी पोलिस ठाणे , सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास मोरे सह अन्य पोलिस कर्मचारी यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा शेवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नित्यानंद नाथा उबाळे यांनी दाखल केला आहे. मा. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत भारतातील सर्व पञकार बंधु भगिनींनी केलं आहे. राजकीय सामाजिक संघटना यांनी देखील संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर अँड विकास भाले यांचे कौतुक केले आहे. गुन्हा तर दाखल करण्यात आला आरोपींना जालना पोलिस अधीक्षक विनायक देशमुख कधी अटक करणार हा प्रश्न सर्व पञकार यांना पडला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला हे खरे पण जे गंभिर गुन्हा कलम 307 समाविष्ट केलं नाही याची खंत संपादक रामेश्वर दरेकर यांनी व्यक्त केली आहे. कलमात वाढ करण्याची आरोपी अटक करण्याची मागणी सर्व पञकार बंधु भगिनीं संघटना करणार आहे. पोलिस अधीक्षक विनायक देशमुख हे आपली कर्तव्य पार पाडतील का ॽ याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत.

कोलम हेडलाईन्स.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी पोलिस उपविभागीय अधिकारी परतुर सहाय्यक पोलिस निरीक्षक उबाळे संपादक दरेकर यांच्या गावात.

आरोपी विलास मोरे सह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शेवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितयानंद उबाळे व परतुर पोलिस उपविभागीय अधिकारी हे दैनिक बुलंद संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर यांच्या गावी पंचनामा करण्यासाठी पोहोचले आहे. संपादक रामेश्वर दरेकर यांचे मोठे भाऊ परसराम शिवाजी दरेकर यांना घडलेल्या घटनेबाबत अधिक माहिती विचारली असता परसराम दरेकर यांनी घडलेला प्रकार सांगितला .

कोलम हेडलाईन्स.
न्यायालयात चुकीच्या पद्धतीने तपास करुन हजर झालेले उबाळे विलास मोरे यांना वाचविण्याची चुक करतिल का ॽ.

मा. औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिस ठाणे शेवली येथे गुन्हा दाखल करण्यात आला हे खरे आहे माञ पुढील सत्य परिस्थिती आधारित चौकशी नित्यानंद उबाळे करतील का ॽ याबाबत अनेकांनी शंका व्यक्त केल्या आहेत. कारण उबाळे यांनी जे साक्षीदार या पुर्वी चौकशी करून आपलं मतं न्यायालयात मांडले होते यात साक्षीदार हेच अवैध धंदे करणारे होते त्यांच्या वर शेवली पोलिस ठाण्यात गुन्हे विविध कलमान्वये दाखल करण्यात आले आहे. माञ मा न्यायालयाने सर्व बाबी फेटाळून गुन्हे दाखल करण्याचे आदेश पारित केले . आतातरी उबाळे , पोलिस उपविभागीय अधिकारी परतुर तपास सत्य परिस्थिती आधारित करुन पिडीत रामेश्वर दरेकर यांच्या कुटुंबाला न्याय देतील हिच अपेक्षा पञकार यांना आहे. आहुती दिलेल्या संपादक रामेश्वर दरेकर यांच्या वडिलांना आहे.

कोलम हेडलाईन्स.
गुंड प्रवृत्तीच्या आरोपी विलास मोरेची संपत्ती जप्त करा. दैनिक बुलंद शक्ती संपादक रामेश्वर दरेकर.

विलास मोरे यांनी आपल्या पदाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून अवैध जंगम स्तथावर मालमत्ता कमावली आहे याची चौकशी करून दोषीं मोरेची संपत्ती शासन जमा करण्यात यावी हि मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला करण्यात येणार आहे. याचे सबळ पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहे. मा. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो अँड विकास भाले भारतातील सर्व पञकार बंधु भगिनींचे जाहीर आभार मानतो . राजकीय सामाजिक संघटना यांचे खुप खुप आभार. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे हे शक्य झाले आहे. माझे वडिल माझ काळीज शिवाजी दरेकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली आज देत आहे. पञकार एकजुटीचा विजय आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *