सई आशिष पाटीलने वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी अनोखा विक्रम

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

ठाणे : ठाण्यात जलपरी या नावाने लोकप्रिय असणाऱ्या सई आशिष पाटीलने वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी अनोखा विक्रम केलाय. तिनं चक्क सायकलवरून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रवास केलायापूर्वी देखील सईने वयाच्या सहाव्या वर्षी पुलवामा हल्ल्याच्या निषेध व्यक्त करत ठाण्याच्या खाडीवरून 100 फूट उंचीवरून उडी घेत अनोखा विक्रम केला होता. आता तिने पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित करून ठाणेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.

सईने 16 डिसेंबर रोजी काश्मीर मधील कटरा येथील पवित्र वैष्णो देवीच्या प्रवेशद्वारापासून प्रवास प्रारंभ केला. सुमारे 3 हजार 369 किमीचा हा प्रवास तिनं अवघ्या 38 दिवसात पूर्ण केलाय. भारतात डिसेंबर- जानेवारी म्हंटल की थंडी आलीच, त्यात या काळात उत्तरेकडील राज्यातील थंडीत सईने आपला प्रवास पूर्ण केलाय. अनेक समस्या तिच्या प्रवासात आल्या. परंतु, न डगमगता खंबीरपणे सईने हा विक्रम केला.

यापूर्वीही सईने नेत्रदीपक कामगिरी केलीय. तिने ठाणे महापौर जलतरण स्पर्धेत बॅकस्ट्रोक , फ्रीस्टायल , बटरफ्लाय , बेस्ट्रोक स्पर्धेत पदक पटकावली आहेत. भारत मातेच्या संरक्षणार्थ वीरमरण आलेल्या शाहिद जवानांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी कारगिल ते श्रीनगर हा 220 किमी चा यशस्वी सायकल प्रवास तिने केलाय. अमृतसर ते अटारी बॉर्डर हा भारतीय जवानांप्रती सायकल चालवीत अभिमान व्यक्त केलाय. जलपरी सई पाटीलने या विक्रमी सायकल प्रवासादरम्यान मुलगी वाचावा, मुलगी शिकवा, स्त्रीभूण हत्या थांबा, माझे आरोग्य माझी जबाबदारी असे विविध संदेश दिलेत. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना स्वातंत्र्य देऊन त्यांच्या ध्येयाला पाठिंबा देण्याचा सल्ला सईच्या पालकांनी दिलाय.

सई इयत्ता पाचवीमध्ये असून ठाण्यातील श्री माँ शाळेची विद्यार्थिनी आहे. वयाच्या आठव्या वर्षी सईनं 100 फुटांवरून खाडीत उडी मारून पोहण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय. सईनं बालकुम ते एकविरा असा पोहण्याचा विक्रम केला. त्याचप्रमाणे अमृतसर ते अटारी बॉर्डर असा देखील समुद्रीप्रवास सईने 8 वर्षांची असताना केलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here