पत्रकार आसाराम कांदे यांचे निधन

पत्रकार आसाराम कांदे यांचे निधन

बीड : माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी येथील आसाराम कांदे हे शुक्रवारी रात्री धारुरहून चोपनवाडीकडे मोटारसायकलवरुन जात असताना तेलगाव येथील माजलगाव साखर कारखान्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले. डोक्याला व दोन्ही पायांना मार लागल्याने त्यांच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्रीच त्यांचे निधन झाले. शनिवार दि.29 जानेवारी रोजी चोपनवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी येथील आसाराम कांदे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारीता क्षेत्रात काम करताना त्यांनी समर्थ लोकनेता, लोकजगत बरोबरच लोकपत्रचे तेलगाव वार्ताहर म्हणुनही काम केले आहे. पाणलोट क्षेत्र, शेळी पालनासह विविध प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करुन बरोजगारांना रोजगाराच्या संधीही आसाराम कांदे यांनी उपलब्ध करुन दिल्या होत्या. आसाराम कांदे हे शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान धारुरहून चोपनवाडी कडे मोटारसायकलवरुन जात असताना तेलगाव येथील माजलगाव सहकारी साखर कारखान्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने कांदे यांच्या डोक्याला व दोन्ही पायांना गंभीर मार लागला. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान रात्रीच त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर शनिवार दि. 29 जानेवारी रोजी चोपनवाडी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here