Republic Day Wishes 2022 : प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

देशावर करोनाचं सावट असलं तरी ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहानं साजरा करण्यासाठी प्रत्येक भारतीय सज्ज झालाय. करोना काळात एकमेकांना डिजिटल पद्धतीनं शुभेच्छा आपण नक्कीच देऊ शकतो. २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू करण्यात आली होती. तेव्हा पासून संपूर्ण देशभर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येते. आजचा हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खास आहे या दिवशी आपण आपल्या प्रियजनांना, नातेवाईकांना मित्र मैत्रीणीना शुभेच्छा संदेश पाठवत असतो.

“स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

“भारत देश विविध रंगांचा, विविध ढगांचा आणि विविधता जपणार्‍या एकत्मतेचा….. प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा”

राजधानी दिल्ली येथे मा. पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्यानंतर राजपथावर विविध कार्यक्रमांना सुरुवात होते. यामध्ये प्रत्येक राज्य विविध झांकी तयार करून दाखवितात. भारतीय सैन्य आपले चित्तथरारक प्रदर्शन सादर करतात. भारतीय वायूदल मार्फत आकाशात विमाने उडविण्यात येतात. याशिवाय याच दिवशी भारतातील नागरी सम्मान म्हणजेच पद्म पुरस्कारांची घोषणा सुद्धा करण्यात येते.

फक्त राजपथावरच नव्हे तर देशाच्या प्रत्येक कान्या कोपऱ्यात प्रजासत्ताक दिन अतिशय हर्षोल्लासात साजरा केला जातो. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सकाळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा केला जातो. शाळेत तर खूपच आनंदाचे वातावरण असते. विद्यार्थ्यांची भाषणे, रंगारंग कार्यक्रम, नृत्य, समुहगीत गायन आणि सर्वात शेवटी म्हणजे गोड पदार्थांचे वितरण. अगदी सर्वांनी हा अनुभव घेतलाच असेल.

“स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात, देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया, चला आपण आपला भारत सुरक्षित, सुविकसित बनवूया, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

“स्वातंत्र्यवीरांना करुया, शतशः प्रणाम, त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..! प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

“बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा”

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here