मुंबई: गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात ओळखीच्यानीच तरुणीचा घात करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला.
याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना शनिवारी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर आज आणखी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती शिवाजी नगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलिसी निरिक्षक यांनी दिली.
पीडित तरुणी ही केटर्समध्ये काम करते. २१ जानेवारी रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास जुना बस डेपो मट्टी रोडवरून पायी घरी जात होती. त्याचवेळी तिच्या ओळखीचे चार तरुण तिला दिसले. त्यातील एकाने ही कुठून आली, अशी विचारणा केल्यावर कामावरून परतत असल्याचे उत्तर तिने दिले. त्यावर दुसऱ्याने तिला तुझ्याशी बोलायचे आहे, माझ्यासोबत चल असे सांगत तिला जवळच्या झोपडीच्या पोटमाळ्यावर नेले. त्याच्या पाठोपाठ अन्य तरुणही तिथे आले आणि त्यांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. ते पाहून तिने आरडाओरडा केल्याने तिचे तोंड दाबत चौघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला आणि घटनास्थळाहून पळ काढला होता.
तातडीने पथके रेल्वेस्थानकावर रवाना
सदर घटनेची माहिती पीडितेने पोलिसांना फोनवरून दिली. ती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मस्के, सहायक पोलीस निरीक्षक देवडीकर यांच्या नेतृत्वाखाली दहा जणांच्या पथकांची नियुक्ती करत सीएसएमटी, एल टी मार्ग, मुंबई सेंट्रल सारख्या रेल्वे स्थानकावर पथके रवाना केली.
तपास करताना उत्तर प्रदेशातील बस्ती येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज पुन्हा दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिरीष इडेकर या तपास करत आहेत. पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
“Very good blog post. I definitely appreciate this site. Continue the good work!
}” visit the following internet page