अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिले

जळगाव : जळगाव शहरातील विठ्ठलपेठ जुने जळगाव परिसरातील बालिका अल्पवयीन असल्याची संपूर्ण जाणीव असताना तिचे लग्न लावून देण्यात आले. लग्नानंतर मुलीची मानसिक व शारीरिक तयारी नसताना पतीकडून शरीरसंबंध राहिल्याने ती गर्भवती राहिल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला.
याप्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आठवी, नववीचे शिक्षण घेणारी अल्पवयीन मुलगी शहरातील जुने जळगाव, विठ्ठलपेठ परिसरात वास्तव्यास आहे. शिक्षण घेण्याच्या वयातच आई व मामाने तिचा विवाह जुळवून आणला. मुलीच्या शरीराची योग्य वाढ झाली नसताना ६ जून २०२१ रोजी तिचा जामनेर तालुक्यातील साहील बशीर तडवी या तरुणाशी विवाह लावून देण्यात आला. मुलगी अल्पवयीन असताना कुटुंबीयांनी शाळा सोडवून तिचा बळजबरीने विवाह लावून दिला.

तसेच मुलाला व त्याच्या कुटुंबीयांनाही ती अल्पवयीन असल्याची जाणीव असताना कुठलाही विरोध न होता लग्न लावून पीडिताची बिदाई झाली. त्यातच पीडिता गर्भवती राहिली. पीडिताला डॉक्टरांकडे नेल्यावर ही बाब लक्षात आल्याने प्रकरण उघडकीस आले. बालकल्याण समिती समक्ष मुलीचे जाबजबाब नोंदवण्यात आले. पीडिताच्या तक्रारीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात पती साहील तडवी, पीडिताची आई, पीडितेचा मामा, सासू जमिला बाशीर तडवी, सासरे बाशीर तडवी, चुलत मावशी आरीफा तडवी, मुलाचा मामा यांच्यावर शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here