अल्पवयीन मुलीस फुस लावुन नेले पळवुन..!

जळगाव  ११ फेब्रुवारी २०२२ । एरंडोल तालुक्यातील एका गावातील १७ वर्षे २ महीने वयाच्या अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी आमीष दाखवुन पळवुन नेल्याची घटना दि८ मंगळवार रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. ८ मंगळवार रोजी मुलीची आई शेतात कामास गेली होती व वडील पिठाच्या गिरणीवर कामास गेले होते. त्यावेळी मुलगी ही एकटीच घरी होती. तीची आई संध्याकाळी शेतातुन परतल्यावर घराला कुलुप लावलेले आढळुन आले. मुलीची चौकशी केली असता ती मिळुन आली नाही. तीच्या मोबाइल वर संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

सदर मुलीचा गावात शोध घेतला असता ती मिळुन आली नाही म्हणुन पित्याने शेवटी पोलिस ठाणे गाठुन आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने आमीष दाखवुन, फूस लावून पळवुन नेल्याची तक्रार दिली. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड काँन्सटेबल राजेश पाटील, काशिनाथ पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here