आंतरराष्ट्रीय

सहा महिन्यांत एकटे राहणाऱ्या ४० हजार लोकांचा मृत्यू, १३० मृतदेह तर वर्षभर सडले; सरकारसमोर नवे संकट


जपानमध्ये एकटे राहाणाऱ्या लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. जपान पोलिसांनी २०२४ च्या पहिल्या सहा महिन्यात देशात झालेल्या मृत्यूंच्या संख्येसंबंधी एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार जपानमध्ये सहा महिन्यात तब्बल चाळीस हजार लोकांचा त्यांच्या राहत्या घरात एकटं असताना मृत्यू झाला.

 

राष्ट्रीय पोलिस एजंसी कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार यामध्ये तब्बल चार हजार लोक असे होचे ज्याचे मृतदेह मृत्यूच्या एक महिन्यांहून अधिका काळानंतर उजेडात आले. तर १३० लोकांचे मृतदेह तर एक वर्षभर त्यांच्या घरांमध्ये सडत पडून होते. या लोकांच्या मृतदेहाची विल्हेवाट तब्बल एक वर्षानंतर लावण्यात आली.

 

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार जपानमध्ये सध्या जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वात जास्त वृद्ध लोक आहेत. त्यामुळे एकटे राहणाऱ्या लोकांची संध्या वेगाने वाढत आहे. दरम्यान जपान पोलिसांच्या रिपोर्टमधून आता वयस्कर लोकांची एकटे राहाण्याबद्दल तसेच मृत्यूबद्दल अधिकची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

 

एकांतात मृत्यू होणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या वृद्धांची

 

राष्ट्रीय पोलिस एजंसीच्या २०२४ च्या पहिल्या सहामहिन्यांच्या अकडेवारीनुसार एकटे राहाणाऱ्या ३७,२२७ लोक मृत्यू झालेल्या आवस्थेत आढळून आले आङेत. यामध्ये ७० टक्के लोक हे ६५ वर्ष आणि त्याहून अधिक वयाचे होते. मृत्यू झालेल्या ४० टक्के लोकांचे मृतदेह एक दिवसाच्या आत आढळून आले होते. तर ३,९३९ मृतदेह एक महिना तर १३० मृतदेह एक वर्षांपर्यंत बेपत्ता होते.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *