दाऊदने किती लग्नं केली,कराचीत दोन ठिकाणी दाऊदचं बस्तान,कोण आहे दाऊद इब्राहिम?

spot_img

वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गेल्या 30 वर्षांपासून पाकिस्तानात लपून बसला आहे. कराचीमध्ये बसून तो जगभरात आपला अवैध धंदा चालवत आहे. भारतीय भारतीय तपास यंत्रणांनी दाऊदचे कॉल डिटेल्सही काढले आहेत.

त्यामुळे तो पाकिस्तानमध्येच असल्याचं सिद्ध झालं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय तपास यंत्रणांच्या डोळ्यात सलत असलेला दाऊद सध्या आपल्या जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

कोण आहे दाऊद इब्राहिम?

26 डिसेंबर 1955 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात दाऊद इब्राहिम कासकरचा जन्म झाला. त्याचे वडील इब्राहिम कासकर हे पोलीस हवालदार होते. त्याचं कुटुंब मुंबईतील डोंगरी भागात स्थायिक झालं. 70च्या दशकात मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये दाऊदने आपली दहशत निर्माण केली होती. पूर्वी तो हाजी मस्तान गँगमध्ये काम करायचा. पुढे त्याचा प्रभाव वाढत गेला. लोक त्याच्या टोळीला ‘डी-कंपनी’ म्हणायचे. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या सीरिअल बॉम्बस्फोटांचा तो मास्टरमाईंड होता. स्फोट घडवून आणल्यानंतर तो भारत सोडून दुबईला पळून गेला आणि नंतर पाकिस्तानात आपला तळ ठोकला. सध्या तो आपल्या कुटुंबासह तिथे राहतो.

त्याच्यावर भारतात दहशतवादी हल्ला, खून, अपहरण, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, संघटित गुन्हेगारी, ड्रग्ज, शस्त्रास्त्रांची तस्करी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2003 मध्ये त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. 2011 मध्ये, एफबीआय आणि फोर्ब्सच्या यादीत त्याला जगातील तिसरा सर्वात वाँटेड फरार गुन्हेगार म्हटलं होतं.

भारताचा शत्रू नंबर वन असलेला दाऊद हा 1993 मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य आरोपी आहे. अमेरिकेनेही त्याला दहशतवादी घोषित केलं आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दाऊदचा ठावठिकाणा शोधण्यात तसेच त्याचा आवाज रेकॉर्ड करण्यात यश मिळवलं आहे. गुप्तचर यंत्रणा त्याच्या पाकिस्तानमधील ठिकाणांपर्यंत पोहचल्या आहेत. पण, त्याला ताब्यात घेण्यात यश मिळालं नाही.

कराचीत दोन ठिकाणी दाऊदचं बस्तान

कराचीतील क्लिफ्टन रोडवर असलेला ‘व्हाईट हाउस बंगला’ हे दाऊदचं पाकिस्तानातील कायमचं निवासस्थान आहे. तो आपल्या संपूर्ण कुटुंबासह तिथे राहतो. या शिवाय कराचीमध्येच डिफेन्स हाउसिंग कॉलनीमध्ये त्याचा एक बंगला (बंगला क्रमांक-37) आहे. नवीन खुलाशानुसार, दाऊद आता कराचीतील डिफेन्स एरियातील अब्दुल्ला गाझी बाबा दर्ग्याच्या मागे रहिम फाकीजवळ राहतो. ज्या रस्त्यावर त्याचा बंगला आहे तो कराचीतील नो-ट्रेसपास झोन आहे आणि तिथे पाकिस्तानी रेंजर्सचा कडक पहारा आहे. दाऊदला आयएसआयकडून संरक्षण मिळत आहे. दाऊदशी संबंधित सर्व पुरावे पाकिस्तानला देण्यात आल्याचं भारत सरकारचं म्हणणं आहे. पण, हे पुरावे खोटे असल्याचा सूर पाकिस्तान सातत्याने लावत आहे. दाऊद पाकिस्तानात नाही, असा पाकिस्तानचा दावा होता. नंतर पाकिस्तानने दाऊदचं कराचीतील वास्तव्य मान्य केलं. मात्र, कारवाईच्या नावाखाली संपूर्ण जगाची दिशाभूल केली जात आहे.

दाऊदने पाकिस्तानी पठाण मुलीशी दुसरं लग्न केलं आहे. दाऊदची पहिली पत्नी मेहजबीन हिनेही याला दुजोरा दिला होता. दाऊदची पहिली पत्नी मेहजबीन प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे भारतातील नातेवाईकांच्या संपर्कात असते. मेहजबीन ही मुंबईची आहे. मेहजबीन आणि दाऊदचा घटस्फोट झालेला नाही. त्याने तिच्या संमतीने दुसरं लग्न केल्याचं म्हटलं जातं.

दाऊद आणि मेहजबीन यांना चार अपत्य आहेत. माहरुख इब्राहिम, महरिन इब्राहिम, मारिया इब्राहिम अशी त्यांच्या मुलींची नावं आहेत तर मोईन इब्राहिम नवाझ हे त्याच्या मुलाचं नाव आहे. दाऊदची मोठी मुलगी माहरुख इब्राहिम हिचा आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियाँदादचा मुलगा जुनैद यांचा निकाह (2014 मध्ये) झाला आहे. दाऊदची दुसरी मुलगी महरिन हिचा निकाह पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन व्यावसायिक अयुब याच्याशी झाला. सर्वात धाटकी मुलगी मारिया 1998 मध्ये मरण पावली. मुलाने सोनिया नावाच्या मुलीशी लग्न केलं आहे. दाऊदला सात भावंड आहेत. यामध्ये हसीना पारकर, सईदा पारकर, फरजाना तुंगेकर आणि मुमताज शेख या बहिणींचाही समावेश आहे. अनीस इब्राहिम, नूरा इब्राहिम आणि इक्बाल अशी त्याच्या भावांची नावं आहेत.

मुंबई बॉम्बस्फोटानंतर अनीस इब्राहिम आणि नूरा इब्राहिम हे दोन भाऊ दाऊदसोबत दुबईला पळून गेले होते. 2007 मध्ये कराची बॉम्बस्फोटात नूराचा मृत्यू झाला. अनीस दाऊदसोबत राहतो. तिसरा भाऊ इक्बाल कुटुंबासह मुंबईत राहतो. हसीना पारकर आणि सईदा या दोन बहिणी मुंबईत राहत होत्या. मात्र, आता दोघींचाही मृत्यू झाला आहे. फरजाना तुंगेकर हिचा देखील मृत्यू झाला आहे. दाऊदची पत्नी मेहजबीन आपला दीर अनीससोबत मिळून दाऊदचं गुन्हेगारी साम्राज्य सांभाळत असल्याचं माध्यमांनी म्हटलं आहे.

दाऊद इब्राहिमवर 1993मधील मुंबई बॉम्बस्फोटांव्यतिरिक्त, 26/11चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला घडवून आणणं, बंदी घातलेली दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन आणि अयमान अल-जवाहिरी यांच्याशी जवळचे संबंध, 2G स्पेक्ट्रम घोटाळा आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंगचे आरोप आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आयएस आणि अल-कायदा प्रतिबंध समितीने दाऊदला जागतिक दहशतवादी घोषित केलं आहे.

युरोप, आफ्रिका आणि दक्षिण आशियामधील डझनहून अधिक देशांमध्ये त्याचा व्यवसाय आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, ब्रिटन, जर्मनी, तुर्की, फ्रान्स, स्पेन, मोरोक्को, सायप्रस, यूएई, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर या देशांचा समावेश आहे. ब्रिटनमध्ये त्याच्याकडे 450 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती आहे. विविध देशांमध्ये 50 हून अधिक मालमत्तांमध्ये त्याने गुंतवणूक केलेली आहे.

– सरकारने कडक नजर ठेवूनही दाऊदचं भारतातील अवैध धंद्यांतून मिळणारं उत्पन्न पूर्णपणे थांबलेलं नाही. काही अहवालांनुसार, त्याच्या कमाईतील 40 टक्के रक्कम अजूनही भारतातून मिळते. बनावट भारतीय चलनी नोटा (FICN) हा त्याचा भारतातील मुख्य व्यवसाय आहे. मात्र, मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे त्याच्या व्यवसायाला मोठा फटका बसल्याचं बोललं जातं.

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

भगवान शंकराचे स्तंभेश्वर मंदिर,दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे ‘हे’ मंदिर

भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक...

‘सीता’ सिंहिण ‘अकबर’ सिंह नावावरण वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..

पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि सिंहिणीला देण्यात आलेल्या नावावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. हे प्रकरण कोलकाता हायकोर्टापर्यंत पोहोचलं आहे. हायकोर्टाने...

अकॅडमीच्या संचालकने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या...

हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजुरी; सिगारेट विक्रीवरही राहणार बंदी; दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास

राज्याने २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. बंगळूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) बुधवारी राज्यभरात हुक्का बारवर...

एसटीचा मोफत प्रवास,दरवर्षी सलग सहा महिन्यांकरिता मोफत प्रवास पास मिळणार कोणाला ?

महाराष्ट्रातील एसटी महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात असून त्यात सर्व वर्गातील महिलांसाठी बस तिकिटांवर 50% सवलत सुरू आहे. अशातच परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना...