मनोरंजन

तरुणीने लग्नासाठी ठेवल्या 12 अटी, तरुण शॉक; म्हणाला ‘दीदी’, नंतर घडलं असं की…


आधी कुटुंबातील वडिलधारी व्यक्तींकडून लग्नासाठी स्थळ आणलं जायचं. आता मॅट्रिमोनी साइट्स आहेत, जिथं आपल्याला हवा तसा जोडीदार शोधण्याची संधी मिळते. असेच ऑनलाईन जोडीदार शोधणारे तरुण-तरुणी ज्यांनी एकमेकांना संपर्क केला.

त्यांच्या व्हॉट्स अॅप चॅटचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होतो.

एका तरुणीचं आणि तरुणाचं शादी डॉट कॉमवर प्रोफाईल होतं. त्यांचं प्रोफाईल मॅच झाल्यावर त्यांनी एकमेकांशी संपर्क केला. व्हॉट्सअॅप चॅटवर त्यांचं बोलणं सुरू झाली. दोघं एकमेकांच्या आवडीनिवडीवर चर्चा करू लागले. याचदरम्यान मुलीने मुलासमोर डझनभर अटी ठेवल्या ज्या वाचून त्याला धक्काच बसला.

या बारा अटी वाचूनच मुलाला धक्का बसला. शेवटी तो समजलं दीदी असं म्हणाला. दीदी हा शब्द वाचताच मुलगी संतप्त झाली. तिनं मुलाची तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे.

काय आहेत तरुणीच्या अटी?
चांगला पगार असावा
स्वतःचं घर असावं.
स्ट्राँग बॅकअप हवा.
निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हवं.
स्वयंपाकासाठी नोकरचाकर असावेत.
वर्षातून एकदा लाँग ट्रिप असावी.
वर्षातून दोनदा स्मॉल ट्रिप असावी.
माझ्यासाठी नोकरी करणं बंधनकारक नसावं.
माझ्याबाबत अपशब्द बोलायचा नाही, हिंसात्मक वागणूक द्यायची नाही.
हुंडा देणार नाही.
आधी लग्न झालं असेल तर पहिल्या पत्नीपासून मूल नसावं.
सासू-सासऱ्यांचा हस्तक्षेप नसावा.

दरम्यान हे चॅट सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ते कितपत खरं आहे याची माहिती नाही. याची खातरजमा नवगण न्यूज करत नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *