
फेब्रुवारी : धुळे (Dhule News) जिल्ह्यातील मोहाडी परिसरात एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा आत्महत्येचा (Attempt to Suicide) प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलांसह आई-वडिलांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेतून सर्व जण अगदी थोडक्यात बचावले असून रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कलहातून धुळे शहरातील अवधान परिसरात ही घटना घडली आहे. भरत पारधी असं आत्महत्या करणाऱ्या कुटुंबीयाचे नाव आहे.
भरत पारधी हे आपली पत्नी आणि मुलांसह या परिसरात राहत होते. आज संध्याकाळी अचानक भरत पारधी यांच्यास कुटुंबातील चार सदस्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलगी जयश्री, पत्नी सविता, मुलं गणेश, गोपाळ अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबीयांची नाव आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये जयश्री (14) आणि गोविंदा (12) हे दोन लहान मुलं आहेत.
शेजाऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे पाचही जणांचे प्राण वाचले आहे. हे ही गरीब घरातली 13 वर्षीय मुलीची 6 जणांना विक्री, साताऱ्यात रॅकेटचा पर्दाफाश मात्र, भरत पारधी यांची प्रकृती गंभीर आहे. भरत आणि सविता यांचे प्रेमसंबंध होते.
प्रेमसंबंधातून दोघांनी लग्न केले होते. पण त्यांच्या या प्रेम संबंधांना भरतच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यातून होणाऱ्या कलहातून या पाचही जणांनी विष प्राशन केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.