मोबाईल लांबविणार्‍या चार अट्टल आरोपींना अमळनेर पोलिसांनी अटक

भुसावळ/अमळनेर : पादचार्‍याच्या हातातून दोन मोबाईल लांबविणार्‍या चार अट्टल आरोपींना अमळनेर पोलिसांनी अटक करीत त्यांच्याकडून तीन मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाखुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ (21, रा.दंडेवाल बाबा नगर, जि.धुळे) व रीतीक उर्फ दादू राजेंद्र राजपूत (20, रा.पवार नगर, चाळीसगाव रोड, धुळे), शेख शहेजाद शेख साजीद हसन (21, रा. जाफर नगर, मालेगाव), शेख शकील रईस अहमद (21, रा.जाफर नगर, मालेगाव) अशी अटकेतील संशयीतांंची नावे आहेत.

पादचार्‍याच्या हातातून लांबवला होता मोबाईल
अमळनेर शहरातील गणेश कॉलनीतील उल्हास बाजीराव सावंत हे24 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुकान बंद करून अमळनेर शहरातून धुळे रोडकडे पायी जात असतांना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या हातातील 18 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल लांबवले होते. याप्रकरणी उल्हास सावंत यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमळनेर पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना संशयीताबद्दल माहिती मिळाल्यानंतर खुशाल मोकळ यास 15 रोजी अटक करण्यात आली व त्यानंतर चौकशीत अन्य तीन साथीदारांची नावे सांगताच त्यांनाही अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या मुसक्या
पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी अनिल भुसारे, शरद पाटील, पोलीस नाईक सिद्धांत शिसोदे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र देशमाने यांनी धुळे व मालेगाव येथून संशयीतांच्या मुसक्या आवळल्या.

संशयीतांविरोधात अनेक गुन्हे दाखल
संशयीत आरोपी खुशाल मोळक याच्यावर मुंबई नाका पोलीस स्टेशन, गंगापूर पोलीस स्टेशन (नाशिक), अंबड पोलीस स्टेशन (नाशिक), मालेगाव छावणी पोलीस स्टेशन, मालेगाव तालुका पोलीस स्टेशन, जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनात एकूण 8 गुन्हे दाखल आहेत तर दुसरा संशयीत रीतीतक राजपूत याच्याविरोधात गंगापूर पोलीस स्टेशन (नाशिक), मालेगाव छावणी पोलीस स्टेशन, उपनगर पोलीस स्टेशन (नाशिक), मालेगाव तालुका पोलीस स्टेशन आणि जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here