माता रमाई आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंती निमित्त१२४ किलो वजनाचा केक


धुळे : प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंती निमित्त सोमवार दि. ७ फेब्रूवारी २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता मनोहर सिनेमा जवळ १२४ किलो वजनाचा केक १२४ महिला भगिनी कापून रमाई जयंती उत्सवाचा प्रारंभ करणार आहे.

तद्नंतर माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची रथावरून भव्य मिरवणूक आनंदात व जल्लोषात निघणार आहे. सदर मिरवणूकीचा समारोप जेलरोड वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रात्री ८ वा. होणार असल्याची माहिती माता रमाई स्मारक समितीचे अध्यक्ष वाल्मिक आण्णा दामोदर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here