23.4 C
New York
Sunday, April 28, 2024

Buy now

लोकसभा निवडणूकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची नावं घोषित केली आहेत.

- Advertisement -

यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नेड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, रस्ते वाहतूक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा समावेश आहे.

- Advertisement -

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांना ही संधी देण्यात आली आहे. स्मृती ईराणी आणि मनोज तिवारी यांचीही नावे स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत अशी अनेक नावे आहेत ज्यांना तिकीट मिळालेले नाही, मात्र त्यांचा या यादीत समावेश आहे. बिहारमधील अश्वनी चौबे यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. तर सय्यद शाहनवाज हुसेन हे इतर निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीत बिहारमधून स्टार प्रचारक बनले आहेत.

महाराष्ट्रातील तीन नेत्यांवर ‘या’ राज्यातील स्टार प्रचारकाची जबाबदारी BJP Star Campaigners List|

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मध्य प्रदेश आणि बिहार राज्याच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आल आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनाही मध्य प्रदेशसाठी स्टार प्रचारक म्हणून नेमण्यात आलं आहे. विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

प्रमुख केंद्रीय नेत्यांशिवाय सुशील कुमार मोदी, मंगल पांडे, संजय जैस्वाल, रेणू देवी, सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, अनिल शर्मा, निवेदिता सिंग आणि निक्की हेम्ब्रेन या बिहारमधील नेत्यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर गेल्या 10 वर्षांपासून दिल्लीचे खासदार आणि भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी यांचाही बिहारच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हेही बिहारमध्ये स्टार प्रचारक बनले आहेत.

मध्य प्रदेशात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही स्टार प्रचारक आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले सुरेश पचौरी यांचाही भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.

मिथुन चक्रवर्ती यांचा समावेश BJP Star Campaigners List|

पश्चिम बंगाल हे भाजपसाठी आव्हानात्मक राज्य आहे जिथे पक्षाला आपल्या खासदारांची संख्या वाढवायची आहे. त्यामुळे भाजपने प्रसिद्ध केलेल्या पश्चिम बंगालमधील ४० स्टार प्रचारकांच्या यादीत चित्रपट अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचीही नावे आहेत.

पंतप्रधान मोदी आणि प्रमुख केंद्रीय नेत्यांव्यतिरिक्त शुभेंदू अधिकारी, दिलीप घोष, स्वपन दास गुप्ता, मुफुजा खातून, रुद्रनील घोष, अमिताभ चक्रवर्ती, सुकुमार राय, सिद्धार्थ तिर्की, देवश्री चौधरी यांच्यासह अनेक बडे नेते पश्चिम बंगालमध्ये भाजपचे स्टार प्रचारक बनतील.

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 25 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशात १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles