21.9 C
New York
Monday, April 29, 2024

Buy now

छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशासाठी थेट नात्यालाच काळीमा,4 वर्षाच्या नातीला सख्ख्या चुलत आजीने 5 हजारात कशासाठी विकल

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर : पैशासाठी माणूस कुठल्याही थराला गेल्याच्या अनेक बातम्या तुम्हीही वाचल्या असतील. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशासाठी थेट नात्यालाच काळीमा फासल्याची घटना समोर आली आहे.

- Advertisement -

शहरात एका 4 वर्षाच्या नातीला सख्ख्या चुलत आजीने 5 हजारात विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

- Advertisement -

तुझी आई आली आहे, तिच्याकडे जाऊ आणि आपण आईस्क्रीम खाऊ असे सांगून 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलीचे तिच्या सख्ख्या चुलत आजीने पैशाच्या हव्यासापोटी अपहरण केले. या चिमुकलीला 5 हजार रुपयात कोपरगावच्या महिलेला विकल्याचा धक्कादायक प्रकार सिटी चौक पोलिसांनी उघड केलाय. या प्रकरणी सलीमा बेगम अजिज खान आणि अलका काशिनाथ उलाळे या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून सदरील मुलीला तिच्या मामाकडे सोपवण्यात आले आहे.

आईने दुसरं लग्न केल्याने चिमुकली अनाथ
धक्कादायक माहिती अशी की मूलबाळ होत नसल्याने कोपरगावच्या अलका काशिनाथ उल्हाळे हिने मुलीची चुलत आजी सलीमा बेग अजीज खान तिच्याकडून तिला विकत घेतले. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत अवघ्या 12 तासात या महिलेला व आजीला अटक केली. याची मुख्य मुलीच्या आईने दुसरा विवाह केल्याने ही मुलगी आपल्या आजीकडे राहत होती. मात्र, आजीकडूनच या नातीला विकल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडालीय.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles