18.4 C
New York
Monday, April 29, 2024

Buy now

महिलेवर बलात्कार करून तिची हत्या,अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात . .

- Advertisement -

मुंबई : एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू झाला आहे. मृत महिलेच्या बहिणीने या बाबत तक्रार दिली असून, त्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हरियाणामधील कैथल जिल्ह्यात एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. शहरातील उद्योग मार्गावरील निर्जनस्थळी असलेल्या एका रिकाम्या खोलीतून महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले आणि महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी कैथल जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. मृत महिला 31 वर्षांची असून, ती कैथलची रहिवासी असल्याचे समजते.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच मृत महिलेचे कुटुंबीय आणि आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. या महिलेनं मृत्यूपूर्वी जीव वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केल्याचं घटनास्थळावरून दिसत होतं. मृत महिलेच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मृत महिला रात्री तरुणांसोबत घराबाहेर पडली होती आणि सकाळी पोलिसांनी तिच्या हत्येची माहिती दिली, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला दोन मुलं आहेत. पतीशी घटस्फोट घेतल्यानंतर ती वेगळी राहात होती, असं सांगितलं जात आहे. जबाबात एका महिलेनं सांगितलं की, मृत महिला माझी नातेवाईक होती. ती रात्री तरुणांसोबत घरातून निघून गेली होती. या पूर्वीही ती अशा प्रकारे जात होती. पोलिसांनी मृत महिलेचा फोटो दाखवत तिच्या हत्येची माहिती दिली.

याबाबत डीएसपी उमेद सिंह यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, मृत महिलेच्या बहिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. मृत महिलेच्या बहिणीनं सहा व्यक्तींवर हत्या आणि बलात्काराचा आरोप केला आहे. मृत महिलेच्या बहिणीने पोलिसांना फोन करून हत्येची माहिती दिली. या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles