अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी

0
188
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

पुणे : अल्पवयीन मुलीला स्वत:चे जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी देऊन तिचा पाठलाग करुन विनयभंग केल्याची घटना हडपसर परिसरातील काळेपडळ येथे घडली आहे. हा प्रकार मागील दोन वर्षांपासून सुरु होता. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतला आहे.

याबाबत पीडीत अल्पवयीन मुलीच्या आईने (वय-31) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर आयपीसी 354 (अ), 354(ड), 504, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल करुन ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 15 वर्षाच्या मुलीला आरोपीने स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करण्याची
धमकी दिली. तसेच तिला वारंवार फोन करुन आणि मेसेज करून तिची छळवणूक केली.
तर तिचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. याबाबत पीडित मुलीचे आई-वडील आरोपीला जाब विचारण्यासाठी
गेले असता त्याने तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. फिर्यादी यांनी तक्रार देताच
पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here