प्रेमात अडसर ठरणाऱ्या चिमुकलीचा जन्मदात्रीनेच घोटला गळा

0
504
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

सोलापूर : प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पोटच्या चार वर्षीय चिमुकलीचा जन्मदात्या आईनेच गळा दाबून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. आईने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या मुलीचा जीव घेतला आहे.

ही घटना माढा तालुक्यातील मोडलिंब येथे ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडलिंब गावात राहणाऱ्या महिलेचे अनैतिक संबंध सुरू होते. मात्र मुलगी या संबंधात अडथळा ठरत होती. त्यामुळे महिलेने प्रियकराच्या मदतीने मुलीला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. महिलेने चिमुकलीची गळा दाबून हत्या केली व मृतदेह पुरंदर तालुक्यातील माळशिरस जवळील भुलेश्वर घाटात फेकून दिला. रेणू शंकर पवार व तिचा प्रियकर उमेश अरुण साळुंके अशी आरोपींचे नावे आहेत.

मोडलिंब येथे राहणारे रेणू पवार आणि उमेश साळुंके यांच्यात प्रेम संबंध होते. या प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या चार वर्षाच्या मुलीची दीड महिन्यांपूर्वी गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह साडीत गुंडाळून भुलेश्वर घाटात फेकून दिला.

या बाबत रेणू पवार हिच्या चुलत बहिणीने पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली. त्यानुसार जेजुरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून घाटात फेकून दिलेल्या चिमुकल्यांच्या मृतदेहाचे अवशेष शोधून काढले आहेत. दोघांवर जेजुरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here