लैंगिक अत्याचार करुन फोटो व्हायरल करण्याची धमकी देत उकळले पैसे अन् दागिने

0
228
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

पुणे : मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून त्याचे अश्लील फोटो काढले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून 30 लाख रुपये घेतले.

याप्रकरणी दोन महिलासह चौघांवर मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ( News) फेब्रुवारी 2019 ते ऑगस्ट 2023 दरम्यान, ठाणे, लोणावळा येथे घडला आहे. ( News)

याबाबत 19 वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी आरोपी अरबाज हनीफ सिप्पी (वय 24), हनीफ इस्माईल सिप्पी (वय-40) यांच्यासह दोन महिलांविरुद्ध आयपीसी 376 (2) (एन), 506, 34 सह पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरबाज याने तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. त्यावेळी आरोपीने तरुणीचे अश्लील फोटो (Obscene Photos) मोबाईलमध्ये काढले. याबाबत कोणाला काही सांगितले तर फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी फिर्यादी तरुणीला दिली. तसेच अरबाज याने तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून तरुणीचा विश्वास संपादन केला. यानंतर त्याने वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले.

शारीरिक संबंध ठेवतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी अरबाज आणि
इतर आरोपींनी तरुणीकडे वारंवार पैशांची मागणी केली. तसेच फिर्यादी यांच्या आई-वडिलांच्या खात्यावरील पैसे,
एफडी सर्टिफिकेट मोडून आलेले पैसे, सोन्याचे दागिने गहाण ठेवून मिळालेले पैसे, पीडित तरुणीचे कॉलेज फीचे पैसे असे एकूण 30 लाख रुपये आरोपी अरबाज याने स्वत:च्या व वडिलांच्या खात्यावर ट्रान्सफर करुन घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here