मोलमजुरी करून घर बांधून घेतले आणि पत्नीला शिकवले,नोकरी मिळताच ग्रामपंचायत सेक्रेटरीसोबत पळाली

0
647
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मजूरी करुन पत्नीला शिकवले, शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला चांगली नोकरीही लागली. पण त्यानंतर मजुराच्या आयुष्याला वेगळे वळण आले. नोकरी मिळाल्यानंतर बायको दुसऱ्यासोबत पळून गेल्याचा मजुर पती ने आरोप केला आहे.

यूपीच्या फतेहपूरमधून ही घटना समोर आली आहे. सीताशरण पांडे असे या तरुणाचे नाव आहे. सीताशरणने आपल्या पत्नीवर आरोप केला आहे. पत्नीला मजूर म्हणून शिक्षण दिले आणि पत्नीला ग्रामपंचायतमध्ये मिशन मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. मात्र आता ती मला सोडून ग्रामपंचायत सचिवाकडे राहू लागली आहे, असे त्याने म्हटले आहे.तिने मुलांनाही सोबत घेतल्याचे त्याने सांगितले.

पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी तो चित्रकूटहून फतेहपूरला गेला. पण त्यावेळी आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप तरुणाने केला आहे. यानंतर पीडित तरुणाने डीएम आणि एसपींकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी त्याने केली आहे. असाच काहीसा प्रकार बरेलीमध्ये तैनात असलेल्या पीसीएस अधिकारी ज्योती मौर्या प्रकरणात झाला होता.

पतीचे पत्नीवर आरोप

सीताशरण पांडेने जिल्हाधिकारी कार्यालयात डीएमकडे तक्रार केली. त्याचे लग्न 6 मार्च 2011 रोजी लोधवारा गावातील नीलमशी झाले होते. लग्नानंतर सर्व काही ठीक चालले होते. दोघांना दोन मुले आहेत. त्याने सासरच्या घरी मोलमजुरी करून घर बांधून घेतले आणि पत्नीला शिकवले. त्यानंतर 16 डिसेंबर 2019 रोजी त्याच्या पत्नीला फतेहपूरच्या बहुआ ब्लॉकमध्ये मिशन मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर नीलम दोन्ही मुलांसह बहाऊ शहरात राहू लागली.

नीलमचे ग्रामपंचायत सचिव अनूप सिंह यांच्याशी प्रेमसंबंध होते, असा आरोप त्याने केला आहे. नंतर ती मुलांसह अनूप सिंगकडे राहायला गेली.सीताशरण पांडे दिल्लीत राहतो खासगी नोकरी करतो. दरम्यान पत्नी मुलांसह अनूप सिंगसोबत राहू लागली हे कळताच तो फतेहपूरला आला. येथे त्याला मारहाण करण्यात आली आणि नीलमला मुलांना भेटू दिले नाही. पत्नीच्या उपस्थितीत पंचायत सचिव अनूप सिंह यांनी त्यांना मारहाण करून पळवून नेल्याचा आरोप आहे.

पत्नीचे गंभीर आरोप

पत्नी नीलमने सीताशरणचे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सीताशरणला दारूचे व्यसन आहे आणि तो कोणतेही काम करत नाही. तो तिच्याकडून पैसे घेऊन दर महिन्याला दिल्ली आणि मुंबईला जायचा. पैसे संपल्यानंतर तो घरी येऊन दारू पिऊन माझ्याशी आणि मुलांशी भांडण करायचा. या कारणास्तव मी मुलांसोबत वेगळे राहत असल्याचे तिचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वीच पती दारू पिऊन ब्लॉकच्या परिसरात आला आणि अवैध संबंधांचा आरोप करत शिवीगाळ करू लागला. यावर बीडीओने खडसावून त्याला बाहेर काढल्याचे नीलम सांगते. जेव्हापासून तिने आपल्या पतीला पैसे देणे बंद केले आहे, तेव्हापासून तो खोटे आरोप करून अधिकाऱ्यांकडे तक्रार करत आहे. दरम्यान पतीवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी ती डीएम आणि एसपींची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here