तू मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करेल तू माझ्यासोबत ये असे म्हणत त्याने तिचा रस्ता अडवला अन…

0
142
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

डोंबिवली : तू मला आवडते म्हणत एकतर्फी प्रेमातून तरुणाने विवाहितेवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक डोंबिवलीत पूर्व परिसरात घडली आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काजल शेख असे या महिलेचे नाव आहे.

नवगण न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे🪀क्लिक करा !

याप्रकरणी हल्लेखोर आरोपी जिग्नेश जाधव याच्या विरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोंबिवली पूर्वेकडील शांतीनगर परिसरात काजल शेख आपल्या पतीसोबत राहते. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास काजल शेख घराच्या दिशेने पाय जात होती. यावेळी तिचा मित्र जिग्नेश तिला भेटला आणि तू मला आवडते, मी तुझ्याशी लग्न करेल तू माझ्यासोबत ये असे म्हणत त्याने तिचा रस्ता अडवला.

मात्र काजलने नकार देताच जिग्नेश संतापला आणि त्याने आपल्याकडे असलेल्या चाकूने काजलच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात काजल जखमी गंभीर झाली असून तिला उपचारासाठी कळवा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात जिग्नेश जाधवविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिग्नेश फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नवगण न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे🪀क्लिक करा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here