शाळेतच मास्तर द्यायचा असेही सेक्स एज्युकेशनचे धडे..

0
412

विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडिओ चक्क शिक्षकानेच दाखवल्याचा प्रकार गोंदियात समोर आला आहे. याप्रकरणी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घ़डला आहे.

गोंदिया : एका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील 52 वर्षीय शिक्षकाला वर्गातील विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती गोंदिया पोलिसांनी सोमवारी दिली आहे. तक्रारीच्या आधारे, कलम 354 (POCSO) कायद्याच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जिल्हा परिषद शाळेतील प्रकार – गोंदिया जिल्ह्यातील डांगोर्ली येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला आहे. हा शिक्षक या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 11 मार्च रोजी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर त्या शिक्षकाला अखेर अटक करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले आहे.

चौकशीनंतर गुन्हा दाखल – मुलींच्या तक्रारीनुसार, आरोपीने इयत्ता 5वीत शिकणाऱ्या आठ मुलींना काही अश्लील व्हिडिओ दाखवले होते. तसेच तो शिक्षक गेल्या महिन्यात मुलींना अयोग्यरित्या स्पर्शही करत होता. मुलींनी त्यांच्या पालकांना याबाबत माहिती दिली. लगेच पालकांनीही शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला व याबाबत चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर याबाबत सोखल चौकशी झाल्यानंतर या शिक्षकाविरोधाक गुन्हा दाखल करत त्याला अखेर अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here