15.6 C
New York
Tuesday, April 30, 2024

Buy now

इराणवर प्रतिहल्ला करण्याआधी इस्रायलची भारताला खास चिठ्ठी, काय म्हटलय त्यात?

- Advertisement -

इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. इस्रायलयने भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना चिठ्ठी लिहीली आहे. इस्रायलवरील हल्ल्यानंतर आज संपूर्ण जगात इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्स म्हणजे आयआरजीसीची ( IRGC) चर्चा आहे.

- Advertisement -

सीआयए, मोसाद, केजीबी आणि रॉ सारख्या आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांशी IRGC ची तुलना होत आहे. विशेष म्हणजे IRGC लष्कर आणि गुप्तचर संघटना दोन्ही सुद्धा नाहीय. इराणच्या आर्मीपेक्षा वेगळी ही पॅरा मिलट्री फोर्स आहे. IRGC थेट इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामनेई यांना रिपोर्ट करतं. वर्ष 2019 मध्ये अमेरिकेने IRGC ला दहशतवादी संघटना ठरवून त्यावर बंदी घातली. युरोपियन युनियन सुद्धा IRGC वर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. IRGC कडे स्वत:ची ग्राऊंड फोर्स, नेवी आणि एअर फोर्स आहे.

- Advertisement -

इस्रायलने भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना चिठ्ठी लिहून इराणच्या IRGC म्हणजे इराण रिवॉल्यूशनी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी संघटना ठरवण्याची मागणी केली आहे. याआधी 2019 मध्ये अमेरिकेने बंदी घातली. याआधी इस्रायलने भारताकडे हमासला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी केली होती. 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. त्यानंतर IRGC ची स्थापना झाली. मध्य पूर्वेमध्ये इराणची ताकद आणि प्रभाव कायम ठेवण्याची या संघटनेवर जबाबदारी आहे. IRGC ला कुठल्याही अडथळ्याविना सहज आपल काम करता यावं, यासाठी इराणचे कायदे आणि न्यायालयापासून त्यांना वेगळं ठेवण्यात आलय. इराणचे राष्ट्रपती सुद्धा IRGC च्या कामात हस्तक्षेप करु शकत नाही.

इराणमध्ये न्यूक्लियर प्रोग्रामचा कंट्रोल कोणाकडे?

इराणच्या सैन्यापेक्षा एकदम वेगळी IRGC फोर्स आहे. अत्याधुनिक पद्धतीने ही फोर्स तयार करण्यात आलीय. त्यांच्याकडे 1,90,000 प्रशिक्षित सैन्य बळ आहे. 20 हजार नौसैनिक आहेत. इराणच्या समुद्र सीमेजवळ ते सक्रीय असतात. इराणच्या मिसाइल आणि न्यूक्लियर प्रोग्रामचा सर्व कंट्रोल IRGC च्या एअरफोर्सकडे आहे. इराणच्या अंतर्गत कुठल्याही स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी IRGC ने एक वॉलिंटियर फोर्स बनवली आहे. त्याच नाव आहे, बासिज. सहा लाख लोक बासिजमध्ये आहेत. ही एक पॅरामिलिट्री फोर्स आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles