बीड मोटारसायकलला अज्ञात वाहनाची धडक, दोघे गंभीररित्या जखमी होऊन ठार

बीड शहरामधील बशीरगंज भागात राहणारे शेख शाहीद सलीम बागवान व हाफिज माहरुफ शफीक फारुकी हे दोघे काल आपल्या मित्राला सोडण्यासाठी परळीला गेले होते. त्यास त्याठिकाणी सोडून हे दोघे परळीहून बीडकडे आपली मोटारसायकल (क्र. एम. एच. २३ बी. डी. २५००) यावर येत होते.

घाटसावळीजवळ रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने या अपघातात शेख शाहीद सलीम बागवान (वय १९) व हाफिज माहरुफ शफीक फारुकी हे दोघे गंभीररित्या जखमी होऊन ठार झाले. या घटनेने बशीरगंज भागामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here