सात गावांचा विधुत पुरवठा सुरळीत करानवीन विधुत उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी
बीड : महावितरण ला वारंवार मागणी करूनही खांडे पारगाव परिसरातील खांडे पारगाव, नागपूर(खु) ,उमरी,नागपूर(बु),अंथरवन प्रिंपी, उमरद खालसा ,अंथरवन पिंप्री तांडा या गावातील लाईटीचा प्रश्न सुटला नाही वारंवार मागणी करूनही या सात गावातील विधुत पुरवठा सुरळीत केला जात नाही या सात गावातील विधुत तारा सन 1972 साली बसवलेल्या आहेत आज त्या तरी कुचकामी झाल्या आहेत यामुळे दररोज विधुत फाल्ट होऊन विधुत पुरवठा बंद असतो अनेकदा विधुत तारा तुटल्यामुळे अपघात झालेले आहेत म्हणून तात्काळ विधुत तारा बदलून विधुत पुरवठा सुरळीत करण्यात यावा व या सात गाव करिता नवीन विधुत उपकेंद्र मंजूर करावं या मागणी करीत बीड जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले या वेळी तात्काळ तारा बदलून विधुत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तर सात गावातील नागरिकांना सोबत महावितरण च्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खांडे पारगाव, नागपूर(खु) ,उमरी,नागपूर(बु),अंथरवन प्रिंपी, उमरद खालसा ,अंथरवन पिंप्री तांडा या गावातील नागरिकांनच्या वतीने देण्यात आले या वेळी निवेदन देताना राजेंद्र आमटे,गोविंद खुराने,राहुल टेकले,खाजभाई पठाण, अशोक शिंदे,जालंदर सोळुंके,मसुराम सोळुंके,राहुल सोळुंके,सिद्धार्थ ढोकणे, सुधाकर काकडे, विक्रम शिंदे,आदींच्या वतीने देण्यात येत आहे
राजेंद्र आमटे