बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एकाच दिवशी तीन जणांनी आत्महत्या


बीड – बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात एकाच दिवशी तीन जणांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तिघांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये एका शिक्षकाचाही समावेश आहे.

सुरेश रामकिसन बडे (वय, 37) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. सुरेश हे शिक्षक असून ते धारूर येथील गावंदरा येथे वास्तव्यास होते. त्यांनी पहाटे 3 वाजता माजलगाव शहरालगत असणाऱ्या केसापुरी कॅम्प येथे घरातील लोखंडी आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी त्यांचे चुलते सुभाष श्रीरंग बढे यांच्या निदर्शनास आली.

दुसऱ्या घटनेत माजलगाव तालुक्यातील कृष्णा बाळासाहेब कोको (वय, 19) या तरूणाने अज्ञात कारणावरून कमरेला असलेल्या बेल्टच्या सहाय्याने राहत्या घरी गळफास घेतला. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसांत नोंद झाली आहे. ही घटना राजेवाडी परिसरात बुधवारी रात्री घडली.

तर तिसऱ्या घटनेत राजेगाव येथील रामचंद्र धुराजी गरड (वय, 40) या व्यक्तीने व्यवहारातील आर्थिक जाचास कंटाळून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण ठाण्यात नोंद झाली आहे. नैराश्यातुन आपले आयुष्य संपवण्याच्या घटनांत वाढ होत आहे. माजलगाव तालुक्यात एकाच दिवशी या तिन घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here